अजय कंडेवार,Wani:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी आवश्यक असलेली खरेदी करण्याकरिता मंडळाकडून दर तीन वर्षांतून एकदा पाच हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आले आहे.मात्र,या योजनेचा काही भामट्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. वणी तालुक्यातील ग्रामीण भागात योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चक्क… बोगस “ग्रामसेवकांचे रॅकेट” सक्रीय झाले असून खोटे लेटरहेड,शिक्के तयार करुन कामगारांचे गृह संच (भांडे) साठी बोगस फार्म जोमात भरण्यात येत आहे. परंतु याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही अखेर हा प्रकार वणीतील पंचायत समितीचा एका मोठया अधिकाऱ्यांनाच आढळून आलें. याबाबत त्यांनी चालत असलेल्या प्रकाराबाबत प्रचंड रोष ही व्यक्त केला आहे.The business of making bogus beneficiaries out of the construction workers’ welfare scheme; Fraud in many areas of the In Wani taluka .
बांधकाम कामगारांना खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य मिळावे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून अनेक वर्षापासून योजना राबविली जात आहे. या योजनेचा फायदा बांधकाम कामगारांना दर तीन वर्षांनी एकदा घेता येणार आहे. तसेच पुढील तीन वर्षांनंतर लाभ घेण्यासाठी अशा बांधकाम कामगारांची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र बांधकाम कामगाराने मंडळाकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याची तक्रारी पुढे येत आहे. वणी शहरातील ग्रामीण भागात या योजनेच्या बोगस लाभार्थी बनविण्याचे काम केले जात असल्याची बाब पाहणीत समोर आली आहे. काही नागरिकांनी खोटे लेटरहेड व शिक्के तयार करत कामगारांचे बोगस फार्म भरून दिले जात आहे. तसेच हे अर्ज कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे तसेच मंजूर होईपर्यंत पाठपुरावा करण्याचेही मोठ्या प्रमाणावर शुल्क घेतले जात असल्याचे चित्र आहे.
बांधकाम कामगार रोज मजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजना अमलात आणले असून या योजनांचा लाभ गोरगरीब बांधकाम, कामगार, शेतमजूरा पर्यंत पोहोचणे ऐवजी या योजनांचा लाभ बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक दृष्ट्या धन दांडगे लोकच फायदा घेऊ लागले असून या गंभीर प्रकरणात अधिकारी कर्मचारी देखील आपले हात ओले करून घेत असल्याचे पहावयास मिळत आहे व बोगस लाभार्थी बनवण्याचा धंदा केले जात असल्याची धक्कादायक बाब ही समोर आली आहे.
•अर्ज भरून देण्याचेही घेतले जात आहे पैसे ..
” वणी तालुक्यांतील ग्रामीण भागात सध्या बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्य (भांडे)खरेदी योजनेसंदर्भात खूप चर्चा आहे. अनेक ठिकाणी काही लोकांनी या योजनेचे अर्ज भरून देण्याची दुकानेच मांडली आहे. याेजनेत पैसे व अवजारे , गृहसंच मिळत असल्याने नागरिकांकडून अर्ज भरण्यासाठी गर्दी केली जात आहे. एक अर्ज भरण्याचे १००० रुपये घेतले जात असल्याचे विदारक चित्र आहे.