Monday, January 19, 2026
HomeBreaking Newsवीज वितरण कंपनी विरोधात "वंचित"आक्रमक.......!"

वीज वितरण कंपनी विरोधात “वंचित”आक्रमक…….!”

•7 ऑक्टो रोजी "एक दिवसीय धरणे" आंदोलन. •नागरीकांनी व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.

अजय कंडेवार,Wani:- महावितरण कंपनीच्या तुघलकी कारभारामुळे पाणी असूनही ते शेताला देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यातून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात विजेची वाट पाहण्यातच शेतकऱ्यांचा दिवस निघून जातो,अशी स्थिती आहे.वणी विधानसभेत वीज वितरण कंपनीचा कारभार अगदी मोठ्या प्रमाणात ढेपाळला आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य त्रस्त आहेत.नादुरुस्त रोहित्र,अतिरिक्त वीज भार, वीज गळती, फॉल्टी वीजबिले, शेतकऱ्यांसाठी १२ तास वीज याबाबत वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करूनही उपाययाेजना केली जात नसल्याने वंचितने सर्वसामान्यांसाठी व शेतकऱ्यांसाठी आक्रामक रूप धारण करीत आदी मागण्यांसाठी “वणी वंचित बहुजन आघाडीचा” पदाधिकाºयांद्वारे 7 ऑक्टो सोमवार रोजी सकाळी 11 वाजेपासून वणी उपविभागीय कार्यालय समोर “एकदिवसीय धरणे आंदोलन” छेडण्यात येणार आहे.Wani Vanchit Bahujan Aghaadi” Aggressors against Electricity Distribution Company.

अशा आहे विविध मागण्या…..

वणी शहर व ग्रामीण भागातील विज पुरवठा खंडीत झाल्यावर त्याची तक्रार भ्रमणध्वनी व्दारे करण्यासाठी २४ तास भ्रमणध्वनी सुरु ठेवण्यात यावे.विज मिटर नादुरुस्त झाल्यानंतर त्या बदल्यात नविन विज मिटर देण्याची जबाबदारी म.रा.वि.वि.कं. ची असतांना नविन मिटर न देता बाजारातून जादा भावाने विज मिटर खरेदी करण्यास भाग पाडतात. बाजारातून विज मिटर न घेतल्यास ब्लॅकमेल पध्दतीने संबंधित ग्राहकांना रु. ६०,०००/- ते १,००,०००/- पर्यंत विज बिल पाठवुन मनमानी पध्दतीने मानसिक त्रास दिल्या जाते. हा ब्लॅकमेलींगचा प्रकार बंद करण्यात यावा.शेतकऱ्यांना फक्त रात्रीचे वेळी विज देण्यापेक्षा किमान १२ तास विज (पुर्ण क्षमतेने) सतत देण्यात यावी.गोडगांव येथे जंगली जनावराची दहशत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रीचे वेळी दहशतीत जिव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी विजेची व्यवस्था करण्यात यावी यासाठी सतत विज सुरु ठेवावी. वीजेचे दरात भरमसाठ वाढ केली असुन सदर दरवाढ सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडणारे आहे. त्यामुळे विजेचे दरात वाढ न करता पुर्वीच्या दरा प्रमाणे विज बिल आकारण्यात यावे.तालुक्यात प्रत्येक गावात असलेल्या विज कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करण्यात यावे.

 

“वंचित बहुजन आघाडी वणी तालुका महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरुध्द वंचित बहुजन आघाडी वणी तालुक्याच्या वतीने वतीने मुद्यावर भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असुन आयोजीत धरणे आंदोलनांत वणी तालुक्यातील सर्व नागरीकांनी / शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ” – हरीश पाते (वणी तालुकाध्यक्ष)

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments