Monday, January 19, 2026
HomeBreaking News"त्या " सर्व्हेत काँग्रेसचे "संजय खाडे"हाच नवीन चेहरा जनेतचा मनात.....

“त्या ” सर्व्हेत काँग्रेसचे “संजय खाडे”हाच नवीन चेहरा जनेतचा मनात…..

•सद्या शहरात"मेरा गरबा बडा हैं"म्हणत मेजोरिटी पॉवर, तिकिटासाठी वापर.  •राजकीय इच्छुकांची वणी विधानसभेसाठी धडपड. •पाच वर्षानंतर ॲक्टिव झालेले "घेताहेत कार्यक्रम"?

अजय कंडेवार,Wani :- विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहे. कांग्रेस व भाजपात टस्सल होणार हेसुद्धा निश्चित आहे. मात्र या दोन्ही पक्षांचे उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपाकडून अद्यापही उमेदवारी जवळपास निश्चित झाली नाहीं. मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रांगा लागल्या आहेत. त्याचप्रमाणे इतरही इच्छुकांनी विधानसभेसाठी सोशलमीडियासह बॅनरबाजीतून धडपड चालविली आहे. परंतु सद्यास्थिती पाहता काँग्रेस मध्ये अनेकांची असली तरीहि “संजय खाडे”हाच लोकसमस्या सोडविणारा नेता म्हणून वणी विधानसभेत झालेल्या त्या एका सर्वेमधून समोर आले आहे.

काँग्रेसचे वणी मतदारसंघात सध्या फॉर्ममध्ये आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येकाकडून मशागत सुरू आहे. भाजपात उमेदवारीसाठी गर्दी नाही. एकंदरीत, हे चित्रच सर्व काही सांगून जाते. मात्र, प्रश्र आहे कांग्रेसचा, डझनाच्यावर ईच्छूक उमेदवारांनी तिकिटसाठी कांग्रेस कडे फार्म भरले आहे. प्रत्येकाला यावेळी कांग्रेसची तिकीट मलाच मिळणार असे वाटत आहे. परंतू जनतेचा कैवारी म्हणून लोकांचा मनात जागा करुन बसून असलेले “संजय खाडे”हे ॲक्टिव उमेदवार म्हणून नव्याने प्रचिती प्राप्त झालेली आहे. अनेक लोकोपयोगी उपक्रम जनतेचा हिताचे केलें म्हणूनच वणी विधानसभेत सध्या “संजय ” नावाचाच डंका वाजताना दिसतो आहे. परंतु या सोबतच काँग्रेसचे दिग्गज माजी आमदार कासावार व जनतेचा नेहमी सानिध्यात राहणारे सुप्रसिद्ध डॉ.महेंद्र लोढा यांनी देखिल तिकीटासाठी कंबर कसलेली आहे ते देखील टक्कर यात तुरुप चे इक्के आहेत मात्र यावरून स्पष्ट एक चित्र दिसत की, वणी विधानसभेत काँग्रेस फुल्ल फॉर्म मध्ये आहे आणि काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे,तीळमात्र शंका नाहीच.

•अन् घर बसल्याच म्हणतात, मी जनतेचा कैवारी….

“नवीन घोडे पक्षाची उमेदवारी मिळेल की नाही, या संभ्रमात असलेल्या काही नेत्यांनी उमेदवारीच्या शर्यतीत आधी मोठा खर्च केल्यानंतर आता जपून पाऊल टाकणे सुरू केले. मात्र उमेदवारीच्या प्रयत्नात आपण मागे पडू नये म्हणून काही इच्छूकांनी घरबसल्याच सोशलमीडियातून मी जनतेचा कैवारी असल्याचा केविलवाणा प्रकार चालविला जात आहे.”

•लोकसमस्या जाणतोय कोण ?

मतदारसंघाची अर्थव्यवस्था शेतीवर निगडित आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पन्न अर्ध्यावर घटले. बेरोजगारी, महागाई, शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्याची संख्या वाढत आहे शेतकऱ्यांच्या अवतीभवती अनेक समस्या उभ्या आहे. मात्र ग्राऊंड लेवलवर येऊन कोणताच नेता त्यांची साधी विचारपूसही करीत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रान पेटवता आले असते. मात्र ते कोणी करायला तयार नाही. कारण हे सारे करताना दमडी खर्च करावी लागते. तिकीट मिळाली तर बरे नाही तर हा सर्व पैसा पाण्यात जाईल त्यापेक्षा पाम्पलेट वाटने, बॅनर लावने, व्हॉटसप, फेसबुक द्वारे घरबसल्या सोपा प्रचार करने बरा असे काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना वाटू लागले आहे. परंतु लोकसमस्या जाणनारा सध्या तरी जनतेचा मनातला संजय खाडे हेच अव्वल आहे.

•नवे चेहरे पाच वर्षानंतर अॅक्टिव्ह….

जनतेच्या मनात काय सुरू आहे हे अद्याप कुणालाही सांगता येत नाही. यात तिन-चार नविन चेहरे चांगले अॅक्टिव्ह दिसत आहे. मतदारसंघात त्यांचे बॅनर झळकले आहे.पण एक “तो स्वतःला आजे- वाजे -गाजे म्हणून घेणारा” हा वणी मतदार संघात विविध मनोरंजक कार्यक्रम घेऊन बैठकावर बैठकाचा सपाटा लावत आहे, शेतकऱ्यांसाठी धडक मोर्चे सुध्दा त्यानी काढला आहे. यात त्यांचा लाखो रूपया खर्च होत आहे. या महाशयाना कोणत्या मोठ्‌या नेत्याने शब्द दिला हे माहित नाही पन त्यांचा हा प्रयोग मात्र सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments