अजय कंडेवार,वणी:- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा व आपल्यासह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलावा. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पनाशक्ती अशा प्रदर्शनातून विकसित होते, असे प्रतिपादन संस्थेचे उपसंचालक पियूष आंबटकर यांनी केले. वणी पंचायत समिती व मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 52 वे तालुकास्तरीय (दि 9 व 10 डिसेंबर) विज्ञान प्रदर्शनाचे वडगाव मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी या शाळेत उद्घाटन थाटात पार पडले .Taluka-level science exhibition inaugurated in a grand manner at Macaroon School.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पियूष आंबटकर,प्रमुख पाहुणे म्हणून अंकिता आंबटकर,शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे व प्रकाश हेडाऊ व मॅकरून शाळेचे मुख्यद्यापिका शोभना यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रदर्शनात प्राथमिक विभागात ७८माध्यमिक विभागात ६८, शिक्षक गटाच्या प्राथमिक विभागातून ११, माध्यमिक विभागातून ४ तर प्रयोगशाळा परिचर गटातून ४ उपकरणे मांडण्यात आली आहेत.प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दिवसभर रांगा लागल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभना मॅडम, सूत्रसंचालन रूपाली यांनी केले.