Ajay Kandewar,Wani:- वणी येथील जयस्वाल PUC सेंटरचा परवाना रद्द करण्याकरिता सहायक पोलीस निरीक्षक,वाहतुक उपशाखा यांनी आर.टी.ओ. विभागाला पत्र देऊन कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक रविंद्र कांबळे यांनी केली आहे.Cancel the license of “that” PUC center in Wani.
तालुक्यातील समाजसेवक रविंद्र कांबळे यांची रुग्णवाहिका एमएच२९ टी/३९१८ या गाडीची PUC प्रमाणपत्राची मुदत संपल्यामुळे (दि.०७-१२-२०२४) जयस्वाल ड्रायव्हींग स्कुल येथे PUC काढण्याकरिता गेले असता पेट्रोल चारचाकी गाडीची पीयुसी प्रमाणपत्राची फी रु. १२५/- असतांना त्यांनी त्यांचाकडून रुपये २००/- घेतलें असा आरोप निवेदनातून लिखित स्वरूपात करण्यात आला आहे.तसेच पीयुसी प्रमाणपत्रावर अधिकृत रु. १२५/- लिहलेले आहे असे न करता अतिरिक्त रक्कम का घेतली जाते आणि पावती देखील दिल्या जात नाही असाही आरोप लावला आहे.जयस्वाल डायव्हिंग स्कुल हे पीयुसी करिता आलेले चारचाकी वाहन राज्य महामार्गावर उभे करतात व त्याची तपासनी करून प्रमानपत्र देतात. वाहतुकीचे नियमानुसार वाहन उभे करणे गैरकायदेशीर आहे एकप्रकारे मुजोरपणाचा कळस गाठून वाहतुकीना अडथळा करीत आहे त्यामळे वाहतुकीचे नियमाची पायमल्ली होत आहे.रत्यावर उभे असणा-या वाहनाला दंड करतात.
सदर पीयुसी सेंटरच्या समोरच दुभाजक यू टर्न आहे आणि पेट्रोल पंपावरुन देणा-या चारचाकी गाडया वळण घेतांना त्याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.सदर पीपुसी प्रमाणपत्र देण्याकरिता रस्त्यावर वाहने उभे करणे नियमबाह्य आहे आणि ते उभी करत असल्यामुळे त्यांना नोटीस देवून विचारणा करून आर.टी.ओ. विभागाला कळवाव ही विनंती तसेच वाहन उभे करुन मुख्य रस्त्याचा वाहतुकीला अडथळा करीत असल्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी रवि कांबळे यांनी वाहतूक विभागाला व पोलीस प्रशासनाला निवेदनातून करण्यात आली.