Wani:- माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात जग अधिक वेगवान होत आहे. यातूनच स्पर्धा वाढतेय. मुलांना वैज्ञानिक क्षेत्रातील नाविण्यपूर्ण घडामोडींची माहिती करुन देणे व त्यातून विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वणी स्नेहदिप काटकर गटशिक्षणाधिकारी यांनी केले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या प्रसंगी ते बोलत होते.
प्रतिकृतींचे मूल्यमापन करतांना….
पंचायत समिती वणी व मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वडगाव येथे दि 9 व 10 डिसेंबर रोजी अतिशय उत्साहात या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला .ग्रामीण भागातील दडलेला भावी विज्ञानिक बाहेर निघावा त्याच्यातील बाल वैज्ञानिक जागृत व्हावा हा उद्देश असल्याचे मॅकरून शाळेचे मुख्याध्यापिका शोभना यांनी सांगितले.या समारोप व बक्षिस वितरणाचा व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्नेहदिप काटकर (गटशिक्षणाधिकारी) हे होते तर विशेष पाहूणे म्हणून मॅकरून शाळेचा मुख्यध्यापिका शोभना,सुनंदा आस्वले, होमराज पटेलपैक,प्रसन्ना जोशी व अजय राजूरकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सुनंदा आस्वले मार्गदर्शन करतांना म्हणाले की,विज्ञान हा विषय मुलांमध्ये कुतुहल वाढवितो. तसेच यात प्रयोग असल्यामुळे मुलांना नाविण्याचा ठाव घेता येतो. वैद्यकिय क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र यासोबतच सर्व क्षेत्रातील नाविन्यपूर्ण शोधाचे व संशोधनाचे अधिष्ठान विज्ञान आहे.यावेळी पुढे बोलतांना म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांतविज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनांची नितांत आवश्यकता आहे. यातूनच मुलांमध्ये भावी वैज्ञानिक होण्याची भावना जागृत होईल.
या पंचायत समिती वणी व मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सहावी ते आठवी उच्च प्राथमिक गट, तर नववी ते बारावी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा दोन गटात या स्पर्धा झाल्या. शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षक (पहिली ते आठवी) व माध्यमिक व उच्च माध्यमिक (नववी ते बारावी) आणि प्रयोगशाळा परिचर यांचा स्वतंत्र गट होता.प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान होता. उपविषय शाश्वत कृषीपद्धती, स्वच्छता आणि आरोग्य, संसाधन व्यवस्थापन, औद्योगिक विकास, भविष्यकालीन परिवहन, संचार व शैक्षणिक खेळ आणि गणितीय प्रतिकृती यासह अनेक नवीन प्रयोगांचा समावेश होता.
यावेळी विविध केंद्रातील केंद्रप्रमुख तसेच गटसाधन केंद्र वणीचे कर्मचारी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक विभागात वर्ग 6 ते 8 च्या विद्यार्थ्यांनी 47 प्रतिकृती, उच्च माध्यमिक विभागात वर्ग 9 ते 12 चे 20 प्रतिकृती, शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक गटात 2 प्रतिकृती अशा एकूण 82 प्रतिकृती सादर करण्यात आल्या. 68 शाळांनी सहभाग घेतला.सदर प्रतिकृतींचे मूल्यमापन सुनंदा आस्वले, होमराज पटेलपैक,प्रसन्ना जोशी व अजय राजूरकर यांनी केले.सर्व विजेत्या स्पर्धकांना यावेळी स्नेहदिप काटकर(गटशिक्षणाधिकारी) व मॅकरून शाळेचा मुख्यध्यापिका शोभना यांच्या हस्ते विजेत्याना प्रमाणपत्र, शिल्ड, व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपाली घाटे यांनी केले. तर आभार निशा वाटेकर यांनी मानले तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
🛑 विज्ञान प्रदर्शनाचे विषय आणि स्तर……..
“प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी असा असून माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम, पर्यावरणीय चिंता, वर्तमान नवोपक्रमासह विकास आणि आमच्यासाठी गणित असे उपविषय ठरवण्यात आलेले आहेत. उपरोक्त विषयापैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित निम्न प्राथमिक स्तर (इ.१ ली ते ५वी), प्राथमिक स्तर (इ.६ वी ते ८ वी) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या (१ ते १२ वी) शालेय विद्यार्थी व शिक्षक प्रदर्शनीय वस्तु, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प तयार करून विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात आले.”
🛑विज्ञान प्रदर्शनीत या शाळांवर बक्षिसांचा वर्षाव…..
उच्च प्राथमिक (सहावी ते आठवी गट):- प्रथम- जि. प शाळा ढाकोरी ,द्वितीय-मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी, वणी.तृतीय-जि. प हायस्कूल,पळसोनी
उच्च माध्यमिक नववी ते बारावी गट:-
प्रथम- अनु. जाती जमाती आश्रम शाळा, परसोडा द्वितीय -संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी, तृतीय- स्वर्णलिला शाळा, वणी.
माध्यमिक शिक्षकगट:- प्रथम – वैभव दहेकर (मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी, वणी.)
प्राथमिक शिक्षकगट:- प्रथम – धीरज तायडे (जि. प. शाळा, गणेशपुर)
प्रयोगशाळा परिचर प्रथम – विलास जाधव.