अजय कंडेवार,Wani:- मोकाट गुरांमुळे रस्त्यावर अनेकदा खोळंबा होता. नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागता. खरे तर, गुरं म्हणजे मुकं जनावर. त्याला मानसासारखी अक्कल थोडीच? मात्र या गुरांचा वापर करुन, त्यांची काळजी घेण्याऐवजी रस्त्यावर सोडून, मोकाट तर त्यांचे मालक होत असतात.त्यामुळे या मालकांवरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे.मात्र रस्त्यावर फिरणार्या गुरांमुळे वाहतूक कोंडी होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघालाही निमंत्रण मिळते.अशा गुरांमूळे बर्याचवेळा अपघात होतात. महिला, वृद्ध व विद्यार्थ्यांना रस्त्यावरून कठिण होऊन जाते. कधीतरी ही जनावरे रस्त्यावरच उधळताना दिसतात.
या सावरकर चौकातील काहीं गुरेपालक आपली गुरे (जनावरे) चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. बर्याच वेळा ही मोकाट गुरे उकिरड्यावर, प्लास्टिक पिशवीत टाकलेले अन्न पदार्थ पिशवीसह खातात.परिणामी बहुतांश गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लस्टिक जाते. प्लास्टिक , सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन ते त्यांना पाचनप्रक्रियेत बिघाड होऊन त्यांची घाण शेण रस्त्यावर असलेल्या घरासमोर अत्यंत दुर्गंधीयुक्त वासाने नागरिकांचा आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.हे मोकाट गायी हैदोस घालत असून सर्वसामान्य नागरिकांना यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत परंतु याकडे नगरपालिका प्रशासन कोणतीही उपाययोजना करतांना दिसून येत नाही आहे . सावरकर चौक तसेच गुरुनानक चौकातही मोकाट जनावरांच्या घटनेमुळे वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. संबंधित यांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरप्रशासनाने जातीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
•सावरकर चौक व सिंधी कॉलोनी : गायींचा वावर, शेण व घरासमोर उघड्यावर टाकलेले अन्न अस्वच्छतेने आजाराला आमंत्रण…..
“सावरकर चौकातील प्रभागात सर्वाधिक जागोजागी कचरा, पाण्याचा , अन्नाचा अपव्यय, अरुंद रस्ते, दाट लोकवस्ती, रस्त्यावर येणारे अन्न त्यातील अस्वच्छता अशा अनेक समस्यांनी या प्रभागाला ग्रासले आहे.”
•एखाद दिवस मोठी दुर्घटना होण्याची भिती आहे.
“मात्र त्यांच्या मालकांना याचे सोयरेसुतक नसते. गुरांचा वापर करायचा, घोडा असेल तर किनार्यावर त्याच्यामार्फत पैसे कमवून घ्यायचे आणि त्यांना चारा द्यायची, सांभाळायची वेळ आणि की रस्त्यावर सोडून आपण मोकळे व्हायचे.त्यामुळे यापुढे जे कोणी आपली गुरे, घोडे रस्त्यावर मोकाट सोडतील त्या मालकांवरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.”