अजय कंडेवार,Wani:- लोकसभा निवडणुकीच्या शेवटचं टप्प्यात वणी विधानसभा क्षेत्रातील कायर येथे इंडिया आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराला गती देण्यासाठी गावातीलच “ज्येष्ठ”(उबाठा गटाचे काही ज्येष्ठ व्यक्ती व काँग्रेसचे काहीं व्यक्ती तसेच तरुण वर्ग) यांनी कंबर कसले असून पायाला घुंगरू बांधल्यासारखं रोज गावात व आजुबाजूंचा गावात भेटी देऊन door to door मतदारांचे लक्ष आपल्या उमेदवाराकडे केंद्रित करण्याचं प्रयत्न करीत आहे तसेच दलीत वस्तीत तर door to door प्रचाराला मतदारांची उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची ताईंचा समर्थकांकडून बोलल्या जात आहे.कडक उन्हाची पर्वा न हे आपल्या समर्थकांसह मित्र पक्षांचे मदतीने ताईंना अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

