अजय कंडेवार,Wani:- वणी तालुक्यातील शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहदा गावातील मंगेश नावाचा तरुणाने एका खेड्या गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोक्सो व विविध कलमान्वये 13 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.”Love, sex and cheating” with a minor girl Incident at Mohda.
पोलिसांच्या माहितीनुसार,मंगेश राजेश्वर वाडगुरे (२५,रा.आष्टी ता.आरमोरी, जि.गडचिरोली) (हल्ली मुक्काम- मोहदा, ता.वणी, जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. वणी तालुक्यातील मोहदा गावात मंगेश हा त्याचा जावयाकडे मागील काही वर्षापासून वास्तव्यास आहे.तो जावयाला त्याचा व्यापारात हाथभार सुद्धा लावायचा . त्याचे एका खेड्या गावातील १६ वर्षीय युवतीशी सुत जुळले तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. असे तक्रारीत म्हटले आहे.जवळपास हा प्रेम संबंध 2 वर्षापासून सुरू असल्याची माहिती मिळाली.एकदा पीडित मुलगी घरी फोनवर बोलत असताना नातेवाईकाने पीडित मुलीला विचारणा केली असता थेट मुलीचा मोबाईल हिसकून आरोपीला नातेवाइकांनी फटकारले असता, पीडित मुलीचा नातेवाईकाना व पीडित मुलीलाच आरोपीने वाटेल त्या भाषेत बोलायला सुरुवात केली “उलटा चोर…कोतवाल को डांटे” असा प्रकार आरोपीने त्यावेळी निर्माण केला. घडलेला हा प्रसंग अल्पवयीन मुलीने नातेवाईकांना पूर्ण सांगताच नातेवाईंकांचा पायाखालची जमीनच सरकली.त्यानंतर क्षणाचा विलंब न करता पीडितेने नातेवाईकाना सोबत घेत शिरपूर पोलीस स्टेशन गाठले व आपबिती सांगितली तिचा तक्रारीवरून बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडिता ही अल्पवयीन असल्याने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी (25) याच्यावर कलम 376, 2 (एन), 3,4 सहकलम पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलीस कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.पुढील तपास वरिष्ठांचा मार्गदर्शनाने ठाणेदार माधव शिंदे यांच्या सुचनेने PSI बुधवंत करीत आहे.