अजय कंडेवार,Wani:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ व्या जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर व सीईओ संजय दोरखंडे यांचा हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांकित पुतळ्यास हारार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पण, ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते” डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंतीनिमित्त या महामानवास मानवंदना करतांना श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर,संचालक रमेश भोंगळे, हरी पांडे, ठाकूरवार,सीईओ संजय दोरखंडे,शाखा व्यवस्थापक प्रवीण नांदे, अमोल मांडवकर, कविश्र्वर शास्त्रकार, दिनेश झाडे व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.