अजय कंडेवार,वणी:- सारे शिकुया पुढे जाऊ या या वाक्यातून शासन शिक्षणाचे महत्व पटवून देत आहे. शाळबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी केल्या जात असतानाच, शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वणी तालुक्यातील जि.प. प्राथ. शाळा निंबाळा (बु.) केंद्र वेळाबाई येथील शाळेत येथील शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंंत एकच शिक्षक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जि.प. प्राथ. शाळा निंबाळा (बु.) केंद्र वेळाबाई शाळेत वर्ग १ ते ५ अशा ५ इयत्ता आहेत. परंतु या ५ इयत्तेमधील विद्यार्थ्यांंना शिकविण्यासाठी फक्त एकच शिक्षक आहे. या ५ वर्गांंना कसे शिक्षण द्यावे हा प्रश्न आता या शिक्षकाला पडला आहे. ही 2024-25 या सत्रापासून कायम असून शाळेत कार्यरत शिक्षकाला विद्यादानासोबतच इतर प्रशासकीय जबाबदार्याही पार पाडाव्या लागतात. त्यामुळे निंबाळा (बु.) येथील विद्यार्थ्यांंचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून एकच शिक्षक शाळेतील विविध जबाबदार्या पार पाडत आहेत. दरम्यान, या एकमेव शिक्षकांची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ड्युटी लागल्यामुळे या शाळेतील विद्यार्थी वार्यावर असतात ,अशा परिस्थितीत शिक्षण समि तीने व पालकवर्गानी बरेचदा एका कायमस्वरूपी शिक्षकांच्या मागणीसाठी निवेदन दिलेले आहेत. तसेच संबंधीत कार्यालयातही सुचना दिल्या आहेत; मात्र अद्यापही येथे वरील रिक्त पद भरण्यात आले नाही. यासंदर्भात केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेतील रिक्त पदाचे अहवाल संबंधीतांना वेळोवेळी सादर केले असल्याचे सांगीतले परंतू अद्यापही शिक्षण विभाग कानडोळा करतांना दिसून आले त्यामुळे निंबाळा (बु.) येथील गावकऱ्यांनी वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात कायम स्वरूपी शिक्षक मिळण्याकरिता गटविकास अधिकारी पंचायत समिती,वणी यांना निवेदन दिलें.
कोड….
“तालुक्यात जवळपास 132 शिक्षकांची कमतरता आहे.याबाबत वणी पंचायत समितीमार्फत जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.तरी या आठवड्यात शिक्षकांचा मागणीबद्दल जिल्हा प्रशासनाद्वारे लवकरच विचार केला जाणार आहे त्यामुळें वणी तालुक्यात शिक्षक मिळण्याची दाट शक्यता नक्कीच आहे.”- किशोर गज्ज्लवार ( गटविकास अधिकारी,पं.स.वणी )