Ajay Kandewar,Wani:- वणी उपविभागात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यवतमाळ यांनी अचूक नियोजन आणि वेगवान कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. LCB चे API दत्ता पेंडकर यांच्या चमूने दोन विधिग्रत संशयितांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता, घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. या कारवाईत २१ लाखांहून अधिक किमतीचे चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने १०० टक्के हस्तगत करण्यात LCB टीमला यश आले आहे.
या प्रकरणात आरोपी दत्ता कुरकुटे (रा. नागेशवाडी, ता. पुसद) याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत पुरावे गोळा केले. LCBच्या पथकाने तपास करत आरोपीने चोरी केलेले दागिने कुठे विकले याचा माग काढला आणि पूर्ण मुद्देमाल परत मिळवला. पोलिसांच्या या कारवाईमुळे पोलिसांबद्दल सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या मनातून आर्त हाक निघत आहे की, “पोलीस के हात लंबे होते है ” स्पष्ट करून एलसीबी चमुने दाखवून दिलंही संपूर्ण कारवाई वरिष्ठांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली. LCBच्या अधिकाऱ्यांनी अचूक माहिती, तांत्रिक तपास आणि सततच्या पाठपुराव्यामुळे गुन्ह्याचा वेगाने उलगडा केला. “गुन्हा झाला तरी सुटका नाही” हा स्पष्ट संदेश देत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
वरिष्ठांचा मार्गदर्शनात API दत्ता पेंढकर, API धीरज बांडे , PSI धनराज हाके, शरद लोखंडे, मनोज आडे, संतोष भोंगे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुकर, तेजस रनखांब, सुभाष जाधव, कुणाल मुडेकर, रमेश राठोड, सलमान शेख, रजनीकांत मढावी, सुनील पंडागळे, राजेश जाधव, रवींद्र शिरसाट, सतीश फुके आदींचा सहभाग होता.पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

