Saturday, April 26, 2025
HomeUncategorizedडी. बी पथकांनी विविध दुचाकी चोरीचे गुन्हे केले उघड....!

डी. बी पथकांनी विविध दुचाकी चोरीचे गुन्हे केले उघड….!

•दुचाकी ताब्यात, चोरट्यांना अटक.

अजय कंडेवार,वणी:- शहरातील डी बी पथकाचे प्रमुख बलराम झोडोकर यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने मोटार सायकल चोरीचा वेगवेगळ्या प्रकरणातील दोन मोटरसायकल चोरट्यास अटक केली असून चोरट्यांकडून तीन मोटरसायकल जप्त केल्या आहेत.आदिलाबाद येथील आर. के. कॉलोनीतील शेख शादाब शेख हबीब (20), मुजाहिद नजिम नसीर अहमद (21),वर्धा येथील पवन पोहनकर (21), घुग्घूस येथील दीपक शंकर मेश्राम (20) व चंद्रपुर जिल्ह्यातील धोपटाळा येथील प्रदीप संजय शेरखुरे असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.Wani D. B squads exposed various two-wheeler theft crimes

सविस्तर वृत्त असे की,पहिल्या घटनेतील फिर्यादी शुभम सुभाष मांडवधरे रा . ग्रामसुकळी , ता.बाभुळगाव यांनी 12 जुलै रोजी वणी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती की,9 जुलै रोजी वणी येथे कामानिमित्त आले असता दिपक चौपाटी येथून MH 29 BG 8346 या क्रमांकाची मोटार सायकल चोरीला गेली असल्याची त्यावरून वणी डी बी पथकानी लगेच कसून तपास सूरू केला व वेगवेगळे कयास लावून तेलंगाना राज्यातील आदिलाबाद येथून शेख शादाब शेख हबीब (20), मुजाहिद नजिम नसीर अहमद (21) यांना विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला त्या व्यतिरिक्त या वरील आरोपींनी जिल्हा अमरावती येथील गाडगे नगर परिसरात चोरी गेलेली मोटर सायकल डिलक्स MH 40 BB 0122 ही सुद्धा मोटासायकल चोरी केल्याची कबुली दिली.

दुसऱ्या घटनेतील फिर्यादी धनंजय किसन गोवार्दिपे रा.आनंदनगर यांनी 13 जुलै रोजी दुचाकी चोरीची तक्रार वणी पोलिस स्टेशन येथे दाखल केली होती. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपी पवन पोहोनकर 21 वर्ष रा. इंदिरा नगर व शंकर मेश्राम 20 वर्ष रा. घूग्गुस या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हिरो पॅशन प्रो MH 29 B Q-1077 ही जप्त करण्यात आली.

तसेच तिसऱ्या घटनेतील फिर्यादी अभिमन्यू तात्याजी गोहणे रा. केसूर्ली, ता वणी यांची दुचाकी जटाशंकर चौकातून 21 में रोजी दुचाकी चोरी गेल्याची तक्रार ठाण्यात दाखल केली होती. त्या चोरीचा गुन्हा देखील डी बी पथकाने डिटेक्ट केला त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपी प्रदीप संजय शेरखुरे रा. धोपटाळा पारधी बेडा याकडून चोरीची दुचाकी हिरो स्प्लेंडर MH 29 J -1879 ही जप्त करण्यात आली. अश्या प्रकारे वणी डी. बी पथकानी अतिशय कुशाग्र बुध्दीचा वापर करीत तपासाचे चक्रे फिरवित गुन्ह्याची उकल केली आहे.

या चोरीचा वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी आरोपींना गजाआड केले असून आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उप. वि.पो. अधिकारी गणेश कींद्रे यांच्या मार्गदर्शनात तसेच वणी ठाणेदार पी. आय अनिल बेहराणी यांचा अधिनस्थ डी. बी प्रमुख बलराम झोडोकर यांच्या नेतृत्वात विकास धड़से, पंकज उंबरकर, वसीम शेख, शाम राठोड़, विशाल गेडाम, गजानन कुड़मेथे यांनी पार पाडली

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments