अजय कंडेवार,Wani:- वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष येत्या ऑगस्ट महिन्यात खासदार प्रतिभा धानोरकर व माजी आ. कासावार यांच्या नेतृत्वात “शेतकरी न्याय यात्रेला” 9 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील समस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला व युवक यांच्याशी संवाद साधणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे झरी तालुकाध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी द वसंत जिनिंग मध्ये मंगळवारी 23 जुलै रोजी सायं.7 वाजता पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शेतकरी न्याय यात्रेचे मुख्य संयोजक झरी तालुका काँग्रेस अध्यक्ष आशिष खुलसंगे, संध्या बोबडे ,तोटावार,घनश्याम पावडे, डॉ.महेंद्र लोढा,अशोक पांडे,मारुती गौरकार व राहुल दांडेकर यांचासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
•काँग्रेसचा मागण्या कोणत्या ….?
सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून त्या शासन दरबारी उचलून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यात काहीं मागण्यांचा देखिल समावेश आहेत.मारेगाव व झरी येथे बस स्टँड करावे. मारेगाव व झरी तालुक्यात क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरु करावे, वणी विधानसभा क्षेत्रातील पिकविमा व ओल्या दुष्काळापासून वंचित असलेल्या शेतक-यांना तात्काळ मदत जाहीर करावी, वणी व झरी तालुक्यातील कंपनीत स्थानिकांना रोजगार द्यावा,तिन्ही तालुक्यात शेतक-यांच्या मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरु करावे,गावागावात बंद असलेल्या वॉटर फिल्टर प्लांटची चौकशी करावी,वणी विधानसभा क्षेत्रात लाखो रुपये खर्च करून केलेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी,शहर व गावातील प्रदूषणावर योग्य मार्ग काढावा.खनिज विकास निधीचा वापर केवळ वणी विधानसभा क्षेत्रातच करावा ही मागणी यात्रेद्वारा करण्यात येणार आहेत.
•काँग्रेसची पत्रकार परिषद स्थानिक पदाधिकारीविनाच…
” विधानसभा निवडणुकीला काही महिने उरलेले असताना काँग्रेसकडून “शेतकरी न्याय यात्रा” काढण्यात येणार आहे. परंतु अश्या परिस्थितीत एका पत्रकात एका स्थानिक एका जिल्ह्याध्यक्षाचे नाव आहे परंतु आणखी काहीं स्थानिक पदाधिकारी मोठं-मोठे पद घेतलेले आहे आणि शहरात असतांना देखील त्यांचे नाव या पत्रकातून वगळलेले आढळले. विशेषतः ते पदाधिकारी पक्षाचा अजेंडा हाती घेऊन अविरत कार्य देखिल करतांना दिसून येत आहे. अश्या ॲक्टिव पदाधिकाऱ्यांची अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना काँग्रेसचा पत्रकार परिषदेबद्दल माहिती नव्हती का? की डावल्यात आले का? की त्यांना बोलावण्यात आले नसावें? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यामुळें ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी चाललीय की काय ?असे असेल तर पक्षाअंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता टाळता येणार नाही असेही म्हणायला हरकत नाही. “