अजय कंडेवार,Wani:- विधानसभा क्षेत्र म्हणजे “ब्लॅक डायमंड सिटी” नावाने ओळखल जातं, कारण या क्षेत्रात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. वणी, मारेगाव, झरी असे तीन तालुके या विधानसभेच्या क्षेत्रात येतात. आता विधानसभेचा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. प्रत्येक जण आपल्याच पक्षाचा झेंडा फडकणार असा, तर प्रत्येक उमेदवार आपणच विजयी होणार असा दावा करत आहेत. परंतु यात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार विश्वास नांदेकर अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. कारण हल्लीचा परिस्थितीत अनेकांनी “विश्वास “वर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचे चित्र विधानसभेत दिसून येत आहे.आहे.Due to “Vishwas Nandekar” in Wani Assembly, “Sena” is still in the forefront.
युवा पिढी ही नव्या युगाचा आधार असल्याने युवा पिढीला शिवसेनेमध्ये प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच अनेक युवक – युवती शिवसेनेसोबत जुळलेले आहेत, जिथे मदतीची गरज आहे तिथे शिवसेना आणि शिवसैनिक अशी पक्षाची ओळख आहे. त्यामुळे जिथे सर्वसामान्यांना गरज असेल तिथे शिवसैनिकांनी पोहोचलेच पाहिजे, असे विश्वास नांदेकर यांचे म्हणणे असते.विधानसभेत नांदेकर यांनी पक्ष बांधणीचा धडाका लावला आहे. मतदारसंघात ठिकठिकाणी ते संपर्क साधून त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी सुध्दा विविध उपक्रम राबवून वणीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुध्दा घेतला. त्यात अनेकांनी उध्दव ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन ” विश्वास ” दाखवित शिवबंधन बांधले.
विशेष:- माजी आमदार विश्वास नांदेकर शिवसेनेचे विश्वास नांदेकर हे तडफदार नेते म्हणून ख्याती आहे. त्यांच्या आमदारकीच्या काळात अवैधरित्या चालणारे कामे पूर्णतः बंद होते. ग्रामीण भागात सेनेची पकड मजबूत असून लोकसभेला सेनेचे शक्ती प्रदर्शन दमदार होते. अधिकारीवर्ग यांच्यावर अल्पसे नाराज असतात कारण जनतेचे काम झाले नाही तर शासनाला धारेवर धरतात त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांची धास्ती असते. हल्लीच वणी विधानसभा क्षेत्रातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसेना (ऊबाठा गट) यांनी ६ नोव्हेंबर रोजी ठिक ठीकाणी रस्ता रोको आंदोलन करून जवळपास पाच तास वाहतुक रोखली तसेच ते नेहमीच त्यांचा मतदारसंघतील वेकोली, कोल डेपो प्रश्न, शेतकरी प्रश्न असो या सर्व प्रश्नाकडे त्यांचा पाठलाग असतोच. महत्वाचे म्हणजे अनेक असे आंदोलने देखिल त्यांनी केले.त्यामुळें वणी विधानसभेत “विश्वास ” मुळे शिवसेना आघाडीवरच असल्याचे चित्र आहे.