अजय कंडेवार,Wani:- राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत वणी येथील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान वेगवेगळे उपक्रम शाळेत राबविण्यात आले. Students got leadership opportunities and scope to pursue free hobbies – Principal Shobhana ma’am
शिक्षण सप्ताह उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सातही दिवस सहभाग नोंदविला. गेल्या आठ दिवसापासून सतत धार पाऊस सुरू असताना ही समारोपच्या दिवशी 400 विद्यार्थी उपस्थित राहून हा आनंदोत्सव साजरा केला. शिक्षण सप्ताहातील प्रत्येक दिवस विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता. या सप्ताहाची सुरुवात अध्ययन अध्यापन साहित्य दिवस या उपक्रमाने झाली.
यात मूलभूत संख्याज्ञान दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, डिजिटल उपक्रम, मिशन लाईफच्या दृष्टिकोनात इकोक्लब स्थापना शालेय पोषण आहार दिवस, शालेय पोषण दिवस व समुदाय सहभाग दिवस असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले .शिक्षण सप्ताह या उपक्रमामुळे शिक्षण कौशल्य, शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे आकाश खुले झालेले दिसून आले. विद्यार्थ्यांना नेतृत्वाची संधी व मुक्त छंद जोपासण्यास वाव मिळाला. परस्परांमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले,असे शाळेचा मुख्यद्यापिका यांनी सांगितले.
हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी शाळेचा मुख्यध्यापिका शोभना मॅडम यांच्या मार्गदर्शनात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच पालक शिक्षक असोसीएशनचे पदाधिकारी यांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला.