Wednesday, September 9, 2026
HomeUncategorizedBreaking....रजा नगरात गोमांस विक्रीचा संशय.....

Breaking….रजा नगरात गोमांस विक्रीचा संशय…..

Ajay ,Wani : शहरातील रजा नगर परिसरात लपूनछपून गोमांस विक्री होत असल्याची माहिती बजरंग दलातील युवकांनी वणी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ५० किलोपेक्षा अधिक गोमांससदृश पदार्थ जप्त केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

माहिती मिळताच पीएसआय वळतकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक रजा नगरात पोहोचले असून घटनास्थळी पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची वैद्यकीय तपासणी व अधिकृत अहवालानंतर त्याचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.दरम्यान, या प्रकरणात संबंधितांकडून चौकशी सुरू असून, तपासाअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page