Ajay,Wani : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वणी उपविभागात अवैध गांजा लागवडीविरोधात कारवाई केली आहे. दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन पाटण हद्दीतील मौजा शिबला गावाजवळील तलाव परिसरातील शेतात गांजाची अवैध लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठांना कळवून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आली.
त्यानुसार पंच, राजपत्रित अधिकारी, कृषी तज्ज्ञ, मापारी व पोलीस पथकाच्या उपस्थितीत शेताची पाहणी करण्यात आली. यावेळी मौजा पाटण येथील शेतात विलास नागोराव टेकाम (वय ३५, रा. पाटी, ता. झरी जामणी, जि. यवतमाळ) याच्या शेतात कापसाच्या पिकामध्ये अंदाजे ४ ते ५ फूट उंचीची एकूण २९ हिरवी गांजा/कॅनॅबिसची झाडे आढळून आली. या झाडांचे पाने, खोड, बिया व मुळांसह एकूण वजन ७ किलो ६४५ ग्रॅम असून, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत २ लाख ३६ हजार ७५० रुपये आहे.
ही कारवाई SP कुमार चिंथा, Ad SP अशोक थोरात आणि SDPO सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB PI सतीश चव्हाण, LCB API दत्ता पेंडकर, API मिलिंद सरकटे, PSI धनराज हाके, पोहवा सुनील खंडागळे, पोहवा सुधीर पिडुरकर, पोहवा सुधीर पांडे, पोना किशोर आडे, पोका रजनीकांत मडावी, पोका सलमान शेख, नरेश राऊत व सतीश फुके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

