Saturday, October 24, 2026
HomeBreaking Newsचुनाभट्टीच्या वेस्ट मालावरून राडा! मुंबईतील ब्रेंड डिकस्टासह तिघांविरुद्ध गुन्ह्या दाखल......

चुनाभट्टीच्या वेस्ट मालावरून राडा! मुंबईतील ब्रेंड डिकस्टासह तिघांविरुद्ध गुन्ह्या दाखल……

Ajay वणी : तालुक्यातील राजूर गावात चुनाभट्टीवरील वेस्ट मालाच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादाने अखेर उग्र स्वरूप धारण केले. जेसीबीच्या साहाय्याने वेस्ट माल खोदण्याच्या कारणावरून झालेल्या वादात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबईतील एका ६० वर्षीय व्यक्तीसह राजूर येथील दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस नोंदीतील तक्रारीनुसार, मल्लिकार्जुनराव व्यंकट अप्पाराव आत्मकुरी (वय ४४, व्यवसाय चुनाभट्टी, रा. मारोती टाऊनशिप, चिखलगाव, ता. वणी, जि. यवतमाळ) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार हे मागील १८ वर्षांपासून चुनाभट्टीचा व्यवसाय करीत असल्याचे नमूद आहे.चुनाभट्टीवरील वेस्ट मालाच्या मालकीवरून यापूर्वीही वाद झाल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने वेस्ट माल खोदण्याचे काम सुरू असताना तिथे गेले असता त्या व्यक्तींमध्ये वाद झाला. यावेळी तक्रारदाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात ब्रेंड डिकस्टा (वय ६०, रा. मुंबई), बाळू श्रीनिवास दासारी (वय ४०, रा. राजूर, ता. वणी) आणि शिनू गोपाल दासारी (वय ३५, रा. राजूर, ता. वणी) यांचा संशयित म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.तक्रारीच्या आधारे वणी पोलिसांनी BNS कलमंतर्ग अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

वेस्टेज मालाचा वाद वणी पोलीस ठाण्यात….

चुनाभट्टीवरील वेस्ट मालाच्या मालकीचा वाद आणि धमकीच्या आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या स्वाक्षरीने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page