Friday, October 16, 2026
HomeUncategorizedराजूरचे 'कामचुकार'सीनियर टेक्निशियन कुंभकर्ण झोपेत...कंत्राटी हेल्पर करताहेत धोक्याचे काम......

राजूरचे ‘कामचुकार’सीनियर टेक्निशियन कुंभकर्ण झोपेत…कंत्राटी हेल्पर करताहेत धोक्याचे काम……

Ajay,Wani : तालुक्यातील राजूर गावात दोन-दोन सीनियर टेक्निशियन असताना गाव 3 तास अंधारात होता. नागरिकांनी वीजपुरवठ्यासाठी कुणाच्या दारात चकरा मारायच्या आणि वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसेल, तर या टेक्निशियनच्या पदाचा उपयोग तरी काय? राजूर गावात नियुक्त असलेले दोन्ही सीनियर टेक्निशियन मुख्यालय सोडून वणीला असतात. इकडे राजूरची लाईट गेली की नागरिकांचा जीव टांगणीला लागतो, पण “त्या दोघेही आळशी साहेबांना” फोन करूनही उपयोग होत नाही, अशी नागरिकांची ओरड आहे. शासनाचा पगार फुकटचा घ्यायचा, पदाचा रुबाब मिरवायचा आणि वेळ आली की जबाबदारीपासून दूर पळायचे, असा कारभार गावात उघडपणे चालत आहे . या कामचुकार व आळशी सीनियर टेक्निशियनची” नियुक्ती गावासाठी की फक्त फुकटचा पगारासाठी ? हा सवाल गावकऱ्यांचा आहे

दुसरीकडे, खासगी तांत्रिक कर्मचारी शंकर आणि कंत्राटी हेल्पर रुपेश आत्राम यांच्याकडून खांबावर चढणे, वीजवाहिनी जोडणे यांसारखी धोकादायक कामे करून घेतली जात असल्याचा जिवंत पुराव्यानिशी माहिती (Geo tag photo videos) आहे. ही धोक्याची कामे करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, अधिकृत परवानगी आणि सुरक्षा व्यवस्था आहे का, याची कुणी तपासणी केली आहे का? दोन सीनियर टेक्निशियनची गावात नियुक्ती असताना “हेल्पर आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या ” जीवाशी खेळण्याची वेळ का यावी? उद्या खांबावर काम करताना कदाचित अपघात झाला, तर जबाबदारी कोण हे आळशी दोन्ही senior Technical घेतील का. “हे कामचुकार”  तोंडी आदेश देऊन काम करून घ्यायचे आणि दुर्घटना घडली की हात वर करायचे, असा प्रकार असेल तर तो अजिबात खपवून घेता कामा नये. या दोन्ही वरिष्ठ तंत्रज्ञांच्या भूमिकेची चौकशी करून सत्य बाहेर आणणे गरजेचे आहे.

4 तास राजूर गाव अंधारात आणि सीनियर टेक्निशियनच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह….

नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नसेल, फोन उचलले जात नसतील आणि धोकादायक कामे खासगी कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जात आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता झोपेतून जागे करणे अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यालयी उपस्थितीचे असणाऱ्या शासनाचा नियमाची स्पष्ट पायमल्ली होताना दिसत आहे. नागरिकांसाठी 24*7 हे दोन्ही टेक्निशियनची प्रत्यक्षात जबाबदारी आहे.विशेष हेल्परला कोणत्या अधिकाराने अशी कामे सांगितली जातात, अश्या आळशी सिनियर टेक्निशियनचे निलंबन व्हायला पाहिजे.फुकटचा शासनाचा पगार घेऊनही नागरिकांना आधारात ठेवण्याचे पाप या दोन्ही “कामचुकारानी” केलं. या दोन्ही कामचुकार senior Technician चे भोंगळ विदर्भ न्यूज समोर आणणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page