Wednesday, September 9, 2026
HomeUncategorizedविश्वास भाऊ नाहीत… पण'विक्रांत' चचडांच्या निष्ठेत ‘विश्वास’ अजूनही जिवंत....

विश्वास भाऊ नाहीत… पण’विक्रांत’ चचडांच्या निष्ठेत ‘विश्वास’ अजूनही जिवंत….

Ajay,Wani : राजकारणात एखाद्या नेत्याच्या मागे उभे राहणे सोपे असते; त्याच्या चांगल्या काळात टाळ्या वाजवणारेही अनेक असतात. खरी कसोटी मात्र तेव्हा लागते, जेव्हा तो नेता सोबत नसतो. त्या कसोटीच्या काळातही ज्याच्या हातातील पक्षाचा झेंडा खाली येत नाही, ज्याच्या मनातील निष्ठा ढळत नाही आणि ज्याच्या ओठांवर आपल्या नेत्याचे नाव तितक्याच अभिमानाने राहते.तोच खरा कार्यकर्ता…वणीच्या राजकीय वाटचालीत अशीच निष्ठा जपणारे नाव म्हणजे “विक्रांत चचडा”.

माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांच्याशी विक्रांत चचडा यांचे नाते केवळ राजकीय नव्हते. ते विश्वास, आपुलकी आणि संघर्षातून तयार झालेले नाते होते. विश्वास भाऊंच्या राजकीय प्रवासात युवक म्हणून खांद्याला खांदा लावून उभे राहताना विक्रांत यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या वर्तुळात त्यांची ओळख ‘विश्वास भाऊंचा राईट हँड’ अशी झाली. ही ओळख कोणत्याही पदातून मिळालेली नव्हती; ती मिळाली होती सोबत राहण्याच्या आणि विश्वासाला पात्र ठरण्याच्या वृत्तीतून.विश्वास भाऊ नांदेकर यांचे नाव वणीच्या राजकारणात आजही घेतले जाते ते एका ठाम, लढवय्या नेतृत्वाच्या आठवणीने. ‘एक था टायगर’ ही उपमा त्यांच्या समर्थकांच्या भावनेतून आजही ऐकायला मिळते. काळ बदलला, राजकारण बदलले, चेहरे बदलले; मात्र त्या पर्वाशी जोडलेली माणसे अजूनही त्यांच्या आठवणी जपत आहेत. त्यात विक्रांत चचडा यांचे स्थान वेगळे आहे. विश्वास भाऊ आज प्रत्यक्षात नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपणहून स्वीकारलेला कार्यकर्ता म्हणून विक्रांत आजही मैदानात दिसतात.

नेता गेला, पण कार्यकर्ता थांबला नाही….

विश्वास भाऊंच्या निधनानंतर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांसाठी हा भावनिक धक्का होता. मात्र विक्रांत चचडा यांनी या दुःखाला खचून जाण्याचे कारण न बनवता निष्ठेला अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला. व्यक्ती नसली तरी विचार असतात, नेतृत्वाची सावली नसली तरी त्यांची शिकवण सोबत असते, या भावनेतून त्यांनी शिवसेनेशी असलेली आपली बांधिलकी कायम ठेवली. पक्षाच्या अडचणीच्या काळातही साथ न सोडण्याची त्यांची भूमिका त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठी ओळख ठरली.

युवा उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करताना विक्रांत यांनी यवतमाळ जिल्ह्यात संघटनात्मक जबाबदारी पार पाडली. त्यानंतर यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणूनही काम करताना पक्षाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. पद मिळाले म्हणून कार्यकर्ता होणे आणि पद गेले म्हणून कार्य थांबवणे, या राजकारणापेक्षा त्यांचा प्रवास वेगळा आहे. पद हे जबाबदारीचे माध्यम आहे; ओळख नाही, या भावनेतून ते युवकांमध्ये सक्रिय राहिले आहेत.

वाढदिवसाचा दिवस… पण उत्सवापेक्षा अभिवादनाला महत्त्व..

विक्रांत चचडा यांचा वाढदिवसही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची हीच वेगळी बाजू समोर आणतो. वाढदिवस म्हणजे स्वतःचा गौरव करून घेण्याचा दिवस न मानता विश्वास भाऊ नांदेकर यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देण्याचा दिवस, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जल्लोषापेक्षा अभिवादनाचे स्वरूप देण्यात आले आहे. आपल्या राजकीय गुरूच्या स्मृती जिवंत ठेवण्याची आणि त्यांच्या कार्याची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची ही धडपड आहे.वणी विधानसभा मतदारसंघातील युवकांच्या राजकारणात विक्रांत चचडा यांचे नाव त्यामुळे केवळ एका पदाधिकाऱ्यापुरते मर्यादित राहत नाही. एक नेता आणि त्याचा कार्यकर्ता यांच्यातील विश्वासाचे नाते किती वर्षे टिकू शकते, याचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विश्वास भाऊंची साथ मिळाली, त्यांच्या सोबत राजकारण शिकता आले आणि त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचे विचार सोडले नाही.हीच विक्रांत यांच्या प्रवासाची खरी कमाई म्हणावी लागेल.

आठवणींचा वाघ… आणि निष्ठेचा वारसदार….

 

आज विश्वास भाऊ नांदेकर यांचे नाव उच्चारले की त्यांच्या संघर्षाची, नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याची आठवण होते. त्या आठवणींना आपल्या कृतीतून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न विक्रांत चचडा करीत आहेत. ही केवळ एखाद्या नेत्याला दिलेली श्रद्धांजली नाही; हा एका विचाराशी केलेल्या बांधिलकीचा प्रवास आहे.कारण राजकारणात वारसा नेहमी रक्ताचा नसतो… कधी तो विचारांचा असतो.विश्वास भाऊंचे पर्व संपले असेल; पण त्यांच्यावरचा विश्वास संपलेला नाही.तो विश्वास आजही एका तरुणाच्या छातीत धडधडतोय, पक्षाच्या झेंड्यात फडकतोय आणि वणीच्या राजकीय मैदानात निष्ठेने उभा आहे.

 

विक्रांत चचडा नाव एक कार्यकर्त्याचे.पण कहाणी एका निष्ठेची.विश्वास भाऊंची सावली आता सोबत नसली, तरी त्यांच्या विचारांचा “धनुष्य “हातात घेऊन चालणारा हा कार्यकर्ता आजही सांगतोय.“नेता गेला म्हणून निष्ठा जात नाही… खरी निष्ठा तर त्याच्यानंतरच सिद्ध होते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page