अजय कंडेवार ,Wani :- नुकतीच चंद्रपूर – वणी-आर्णी लोकसभा निवडणूक पार पडली.अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षासाठी जय्यत प्रचार केला. वणी विधानसभेतील महाविकास आघाडीचा प्रचार सभेसाठी अख्खे गाव भेट देणे, कॉर्नर सभांपासून तर सूक्ष्म नियोजनपर्यंत अतिशय उत्कृष्टरित्या संजय खाडे यांनी केले तर शिवसेना पक्ष वाढीकडे शिवसेना विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळण्यात गड राखला आहे. तसेच सर्व घटकपक्षांनी एकजुटीने कार्य केले व सोबत घेऊन आतापर्यंत त्यांनी लोकसभेचे आव्हान सहज पेलले.An overall picture of “Sanjay Khade” proving the faith of “pratibhaTai” in the Wani Legislative Assembly.
हल्ली राजकारणात निष्ठा, विश्वास याला कवडीची किंमत राहिलेली नाही. स्वार्थापोटी नेत्यांसह कार्यकर्ते ही आज एका तर उद्या दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. दरम्यान, प्रचार करताना कार्यकर्त्यांची एकजूट ठेवणे हेही तेवढेच महत्त्वाचे काम आहे. नेमका हुद्दा घेरून दोघांनीही आपापल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजन चालविले. त्याचबरोबर प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांची संपूर्ण काळजी त्यांनी चालविली आहे.मात्र,सुरुवातीच्या काळापासूनच दिवंगत खासदार सुरेशभाऊ धानोरकर व प्रतिभाताई यांच्याप्रति एकनिष्ठता ठेवल्याची पावती संजय खाडे यांचा रुपात काँग्रेस पक्षाला मिळाली. नेमके याच संधीचे सोने त्यांनी केले. सर्वांना लाडके असलेल्या संजय खाडे यांनी आतापर्यत पक्षाची मोट बांधून ठेवली आहे. विशेषतः लोकसभा निवडणूकीचा आधी नव नवीन उपक्रम हाती घेतले. त्यांनाही यशस्वीरित्या पार पाडले. पक्षाला “नविसंजिवनी “देत सामान्यजनतेपर्यंत पोहोचून काँग्रेसचा मताधिक्याला वाढ कसे करता येईल याबाबतही चाणाक्षरीत्या नियोजन करून “ताईंना” लोकांमधे “फोकस” करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संजय खाडे यांनी केले हे सामान्य जनतेस ठाऊक आहेतच त्यात तिळमात्र शंका नाही.
दुसरीकडे निवडणुकीचा काळात ताईंना आधार म्हणून वणी क्षेत्रात शिवसेनेला संघटनात्मक उभारी देण्याचे काम संजय देरकर यांनी केले. एकंदरीत या लोकसभेच्या नियोजनाची घोडदौड पाहता वणी विधानसभेत संजय खाडे यांनी नेतृत्व सिद्ध करून ताईंचा विश्वासही सिद्ध केल्याचे एकंदरीत चित्र आहे.