अजय कंडेवार, Wani:-वणी – यवतमाळ रोडवरील रस्त्याला लागून असलेल्या खिवंसरा यांचा गोदामाचे ६० वर्षीय रखवालदाराची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.The thrill of the murder of the janitor happened in the middle of the night.
वणी तालुक्यातील पळसोनी जवळील वणी – यवतमाळ रोडवर असलेल्या खीवंसरा यांच्या सिमेंट व रॉडचा गोदामचे रखवालदार म्हणून असलेल्या जीवन झाडे अंदाजे (वय ६०),रा. आश्टोना, ता राळेगाव, जि. यवतमाळ असे आहे.यवतमाळ रोडवरील एका शेतात खिवंसरा याचे सिमेंट व रॉडचे गोदाम आहे.या गोदामचा लगतच बांधलेल्या खोलीत जीवन झाडे व त्याचा पत्नीसह राहत असायचा.रविवारचा मध्यरात्री तो त्या ठिकाणी एकटाच होता.घटनेचा दिवशी त्याची अर्धांगिनी ही काही कामानिमित्त गावाकडे गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. रविवारी मध्यरात्रीचा सुमारास कोणीतरी अज्ञात इसम चोरीचा उद्देशाने आले असावे . ही बाब तेथील रखवालदार याला अज्ञात इसमांची चुणूक लागताच त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला असावा त्यावरून त्या अज्ञातांनी या रखवालदाराची हत्या केली असावी असा कयास वर्तविण्यात येत आहे. अद्यापही काहीही स्पष्ट झाले नाही. सोमवार ता.29 एप्रिल रोजी ही घटना सकाळी उघडकीस येताच आजूबाजूचा गावात ही बाब वाऱ्यासारखी पसरली असता खळबळ सुरू झाली.
तसेच याबाबत माहिती पोलिस यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हत्या कोणी केली? का केली.या बाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, तपासासाठी श्वान पथक मागविण्यात आले असून पुढील तपास वणी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे व वणी पोलीस स्टेशनचे पो.नि अनिल बेहेरानी व सहकारी करीत आहेत.