अजय कंडेवार,Wani:- दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व श्री शिव बहुउद्देशिय संस्था, शिंदोला यांच्या संयुक्त विद्यमाने वणी तालुक्यातील कानाकोपऱ्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत वैद्यकियसेवा व उपचार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार या शिबारीचे आयोजन ता.५ में २०२४ रविवार रोजी स.९ ते दु. २ पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शिंदोला येथे करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात मेडिसिन, स्त्री रोग, अस्थीरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग, न्यूरॉलिजी, शल्य चिकित्सक, कान, नाक, घसा, मेंदू शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जन), किडनी रोग तज्ञ, हृदयरोग चिकित्सक आदी व्याधींवर तज्ञ वैद्यकीय चिकित्सक तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. रुग्णांना औषधोपचार देखील निशुल्क असून शिबीरस्थळी रक्तदाब, मधुमेह तपासणी, डोळ्यांचे सर्व आजार, मोतीबिंदू, शरणक्रिया, तिरळेपणा, हायड्रोसील, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्यांचे आजार, मुतखडयाचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायरॉईड) , मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, गाठी, महिलांचे आजार,बालरोग रोग मध्ये हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण, तसेच लहान मुलांचे सर्व आजार तसेच अस्थिरोग तज्ञ संधिवात मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय, फॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजा राचे निदान व उपचार करण्यात येईल तसेच अधिक तपासण्या किंवा रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असल्यास शिबीरस्थळावरून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आयोजकांच्या वतीने निशुल्क वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे.
• शिबीरातील काही “सुविधा” देखील वाचा……
शिबीर स्थळावर नोंदणी मोफत लघवी चाचणी सोनोग्राफी) मोफत, तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी मोफत व भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल. भरती रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत अतिविशिष्ट चाचण्या (सि.टी. स्कॅन, एम. आर. आय इत्यादी चाचण्या) आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत,रुग्णाचा आजार सरकारी योजनेत येत असल्यास, सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल,या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा देण्यात येईल,फाटलेले ओठ, दुभंगलेला टाळू (जाभाडा) तसेच जन्मतः असलेल्या मुखविकृतीवर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल तसेच गुडघा व कंबरेच्या सांध्याचे प्रत्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास मोफत करण्यात येइल..
या शिबिराला सकाळी ९ वाजता प्रारंभ होणार असून सायंकाळी २ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच वेळेवर गैरसोय होऊ नये यासाठी आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन संजय निखाडे – 9405151211 मुरलीधर उमाटे- 9921112903 यांनी केले आहे.
सुचना :
•भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था मोफत राहील.• शिबिरामध्ये येताना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणावे.