अजय कंडेवार,वणी:- अचानक आलेल्या पावसाने कहरच केला आहे.त्यादरम्यान तालुक्यातील राजूर इजारा या गावात घरावर ताडपत्री झाकतांना एका 60 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता.23 सायंकाळच्या वादळ वाऱ्याचा सुमारास घडली.
रामभाऊ कोहळे (60) असे या मृतकाचे नाव आहे.सोमवारी अचानक आकाशात ढग आले. अचानक वादळाला सुरुवात झाली. पाऊसाचा सरी सुरुवात झाली. रामभाऊ आपले सर्व कामे आटोपून घरी येताच पाऊस पडत असल्याचा घाईने घरावर चढून ताडपत्री टाकत असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटक्याने हा मृत्यू झाला असावा असा कयास वर्तविण्यात येत आहे.ही बाब घरच्यांना चटका लावून जाणारीच अचानक अश्या निघून जाण्याने कोहळे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. त्यांचा मृत्यू पश्चात पत्नी,मुले व मोठा आप्त परिवार आहेत.