अजय कंडेवार,Wani:- Big political upheaval in Chandrapur Loksabha चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असून पुढील मतदानापूर्वीचे 1 दिवस गुप्त प्रचार सुरू आहे, मात्र त्यापूर्वी वणी-आर्णी विधान सभेतील राजकीय क्षेत्रात मोठी घडामोड बघायला मिळाली.
18 एप्रिलला गोंडवाना जंगोम दल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुवर्णा वरखडे ने India आघाडी व महाविकास आघाडीच्या चंद्रपूर-वणी-आणी लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना ऐन मतदानाचा एक दिवसाआधी अधिकृत पत्र काढून जाहीर पाठिंबा दिला. या पाठिंब्याने वणी – आर्णी या विधानसभा क्षेत्रात मताधिक्यात वाढ होणार यात शंका नाही.
वाढत्या अन्याय-अत्याचार, असुरक्षित महिला, बेरोजगारी, खाजगिकरण, शिक्षण व्यवस्थेचे व्यावसायिकिकरण, सांप्रदायिक वाद, शेतक-यांच्या समस्या, आदिवासींवर लादले जाणारे कायदे आणि भविष्यात भारतीय जनतेवर लादल्या जाणाऱ्या हुकुमशाही चे सावट बचता देशाचे संविधान, देशाचे लोकतंत्र वाचविन्याकरीता लोकसभा निवडणून २०२४ ला गोंडवाना जंगोम दल महाराष्ट्र या काँग्रेस पक्षाच्या India आघाडी व महाविकास आघाडीच्या चंद्रपूर-वणी-आणी लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना जाहिर पाठींबा दिल्याची माहिती राजकीय क्षेत्राची खळबळजनक माहिती पत्राद्वारे समोर आली.