अजय कंडेवार,Wani:- लोकसभा निवडणुकीवर होवू घातलेला बहिष्कार मोडीत काढून निर्विंघ्न व संवैधानिक पध्दतीने मतदान प्रक्रिया प्रशासनाने काटेकोर उपाययोजना करावे तसेच जो कोणी गावात मतदारांना मतदानापासुन वंचित ठेवेल त्यांचावर कायद्यान्वये कारवाई करण्याकरीता शिंदोला ग्रामस्थांनी १७ एप्रिल रोजी SDO यांना निवेदनाद्वारे मागणी केली.We do not support voting “boycott” Shindola villagers Elgaar मागील काही निवडणुकांवर वणी विधानसभेतील शिंदोला येथील ग्रामस्थांनी एकमताने बहिष्कार टाकला होता. स्थानिक समस्याकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधणे हा त्यामागील हेतू होता. माहूर देवस्थानच्या जमिनीचा मुद्दा अतिशय महत्वाचा असुन पिढ्यानपिढ्या जमिनी बाहुन उपजिवीका करणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनदरबारी न्याय मिळत नसल्याने स्थानिक शेतकरी रास्त भुमिका बजावत होते.मागील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदोला येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर सुध्दा शासन प्रशासनाने शेतकरी हिताचा कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, तर आता होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे काही ग्रामस्थांनी ठरवले आहे यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे दिसत आहे. असाही आरोप काही ग्रामस्थांनी या पत्रातून केली आहे.
शिंदोला या गावातील 70 टक्के ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकू नये अशा भुमिकेत आहेत तर उर्वरीत ग्रामस्थ बहिष्कारावर ठाम आहेत. मतदानाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार असल्याने कोणीही मतदानापासून वंचित राहु नये याची खबरदारी शासनाने घेणे गरजेचे आहे. मतदानाचा अधिकार लोकशाहीच्या विचारसरणीसाठी महत्वाचा आहे. खासदारांच्या माध्यमांतून स्थानिक समस्येंचा निपटारा करण्यासाठी मतदान होणे गरजेचे आहे. तर मतदान करु नये याकरीता काही व्यक्ती दबावतंत्राचा वापर करतील, व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.तसेच काही समाजकंटक मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार घडवतील त्यांचा बंदोबस्त प्रशासनाने करणे गरजेचे आहे.लोकशाही अबाधित रहावी याकरीता मतदानात भाग घेणार आहोत. बहिष्काराला आमचा पाठींबा नाही, तरी निर्विघ्न मतदान प्रक्रिया पार पाडावी यावर प्रशासनाने काटेकोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच जो कोणी गावातील मतदानापासुन वंचित ठेवेल त्यांचेवर कायद्यान्वये कारवाई करावी या निवेदनातून ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी संजय निखाडे, नयन मडावी, किशोर किनाके, अशोक कुमरे, नंदू गिरी आदि ग्रामस्थ उपस्थित होते