Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील मोहदा गाव हे खरोखरच खनिज संपत्तीने नटलेला आणि विविधतेने समृद्ध असा हा गाव आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यांतून येऊन स्थायिक झालेल्या लोकांच्या एकत्र सहवासाने घडलेले हे एकतेचे प्रतीक असलेले गाव म्हणून मोहदा ओळखले जाते.
या गावचा विकास आणि लोकहिताचा ध्यास घेत, उपसरपंच सचिन रासेकर यांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेतला आहे. “काम झालेच पाहिजे” या कार्यनिष्ठेच्या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन रासेकर गावात राबवत असलेले विविध उपक्रम आज लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.गावातील कोणत्याही कामात स्वतःला झोकून देणारे उपसरपंच सचिन रासेकर हे धडाकेबाज नेतृत्वासाठी ओळखले जातात. कोणत्याही कामाचा “उदो.. उदो …न करता” ते स्वतः कामात गुंतून राहतात आणि ते पूर्ण होईपर्यंत शांती ठेवत नाहीत. शेतकऱ्यांसोबत असो वा गावातील सामान्य नागरिकांसोबत, काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी त्यांचा कठोर पण न्याय्य दृष्टिकोन प्रत्येकाला जाणवतो.गावातील कुणालाही टोचत न बोलणारे, शांतपणे हसून प्रतिसाद देणारे आणि गावकऱ्यांशी मित्रासारखे वागणारे उपसरपंच सचिन रासेकर यांच्या आज त्यांच्या वाढदिवस आहे.
त्यांनी नेहमीच गावाच्या विकासासाठीच काम केले आणि प्रत्येकाच्या मदतीला तत्पर राहिले.सचिन रासेकर हे राजकारणाच्या वारेळीत कधीही फसत नाहीत. विरोधक जरी टीका करत असले तरी त्यांच्या शांत, नम्र पण ठाम कामगिरीसमोर ते टिकत नाहीत. गावकऱ्यांच्या मनात त्यांचे स्थान अढळ आहे, हे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लक्षात येते.
•गाव विकासासाठी सतत धडपड….
शेतकऱ्यांचे काम, निराधार व्यक्तींसाठी मदत, गावातील कार्यक्रम किंवा उपाययोजना – सचिन रासेकर नेहमी पुढे असतात.सत्ता कोणाचीही असो, गाव विकासच प्रथम या तत्त्वावर त्यांचा विश्वास ठाम राहतो.त्यांच्या प्रयत्नांमुळे मोहदा गावात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत, जे विरोधकांना मान्य करावेच लागतात.अलीकडेच वणी ग्रामीण मंडळ चिटणीसपदी निवडून आलेले सचिन रासेकर हे त्यांच्या कार्याचा पुरावा आहेत. या पदावरून ते गावातील समस्यांना प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम अजून प्रभावीपणे करतील.उपसरपंच सचिन रासेकर हे केवळ राजकारणी नाहीत, तर गावासाठी लढणारे खरे सोबती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोहदा गाव नेहमी सुरक्षित आणि विकसित राहील.राजकारणात स्वार्थी आणि चमकणारे नेते बहुतेक दिसतात, पण मोहदा गावाला मिळालेले खरे भाग्य म्हणजे सचिन रासेकर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देत गावकऱ्यांना आणि विरोधकांना एक संदेश – काम करण्याची खरी ताकद वाढवून दाखवली जाते, केवळ वाक्यांनी नाही म्हणून मोहदाचा लाडका उपसरपंच सचिन रासेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

