Ajay Kandewar,Wani : तालुक्यातील पिंपळगाव परिसरातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी वेकोलीच्या बेजबाबदार कारभाराचा पाढा वाचत ९ ऑक्टोबर रोजी जुनाड फाटा येथे रस्ता रोको आंदोलन उभारण्याचा जाहीर इशारा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचे प्रश्न न सोडवता वणी नॉर्थ चे महाप्रबंधक व वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत आहे असं थेट आरोप गावकऱ्यांनी व सरपंचाने केलेला आहे. यामुळे पिंपळगाव सरपंच दीपक मत्ते यांनी दिलेल्या निवेदनातून “रास्ता रोको”चा गर्भित इशारा देत निष्क्रिय वेकोली महाप्रबंधकाला जागे करणार असल्याचं म्हटले जात आहे.
पिंपळगाव परिसरासह उकणी, बोरगाव, जुनाड, निळापुर ब्राम्हणी, कोलार, पिपरी या गावातील प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी वेकोलीच्या धूळ, प्रदूषण, नादुरुस्त रस्ते, आरोग्य दुष्परिणाम, डम्पिंगचा धोका आणि उर्वरित जमीन संपादनाच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक वेळा निवेदनं, पत्रव्यवहार करूनही वेकोली प्रशासन व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.धूळ व प्रदूषणामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे.ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम,खान परिसरातील काटेरी झुडपांमुळे जंगली प्राण्यांचा त्रास वाढला,जुनाड फाटा–उकणी परावर्तित रस्ता केला, परंतु ग्रामस्थांसाठी समांतर रस्ता नाही तसेच गावालगत धोकादायक डम्पिंग सुरू असते.रात्रीच्या प्रवासासाठी विद्युत दिव्यांची सोय नाही.या वेकोलीला खाणीसाठी जमीन दिली, पण न्याय मात्र दिला नाही.विशेषता ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, वणी येथे झालेल्या बैठकीत वेकोलीकडून जबाबदार अधिकारी न येता प्रतिनिधी पाठवण्यात आला. त्यामध्ये समस्येवर कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अधिक वाढला आहे.या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून, नाईलाजाने प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता जुनाड फाटा येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी वेकोली प्रशासन व संबंधित जबाबदार अधिकारीच पूर्णपणे जबाबदार राहतील. असा थेट इशाराही निवेदनातून सरपंच दीपक मत्ते यांनी दिला.

