Thursday, November 5, 2026
HomeBreakingलेखी आश्वासनांचा "शब्दखेळात" आंदोलन "20 मिनिटात" संपले.......

लेखी आश्वासनांचा “शब्दखेळात” आंदोलन “20 मिनिटात” संपले…….

Ajay,Wani:- चिखलगाव वाय पॉईंट येथे कोळसा प्लॉट हटविण्यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर प्रशासनाने दखल घेतली. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नायब तहसीलदार विवेक पांडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे गांभीर्य प्रशासनासमोर मांडल्यानंतर त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले. आंदोलकांनी नमूद केलेल्या सर्व मागण्यांबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) व तहसीलदार यांच्यापर्यंत माहिती पोहोचविण्यात येईल. तसेच संबंधित सर्व विभागांशी चर्चा व लेखी पत्रव्यवहार करून सर्व वाजवी मागण्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाचा प्रतिनिधी आंदोलनस्थळी येऊन लेखी आश्वासन देतो, ही आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड असली तरी या आश्वासनातून आंदोलकांच्या मुख्य मागणीचे समाधान झाले का, हा प्रश्न कायम आहे.

विशेष म्हणजे, संपूर्ण आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या कोळसा प्लॉटच्या प्रश्नावरच प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळाले नाही. ‘चर्चा करू, पत्रव्यवहार करू, पाठपुरावा करू’ अशी लेखी भूमिका प्रशासनाने घेतली;मात्र ‘कोळसा प्लॉट तात्काळ हटव’ असे स्पष्ट आश्वासन ना तोंडी मिळाले, ना लेखी पत्रात त्याचा उल्लेख करण्यात आला. तरीही तरीही आंदोलकांना एवढेच उत्तर समाधान झालं.आंदोलकांची प्रमुख मागणी कोळसा प्लॉट हटविण्याची असताना त्या मागणीवर नेमका निर्णय काय, प्लॉट हटविण्यासाठी कोणती कार्यवाही होणार आणि त्यासाठी किती कालावधी लागणार, याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. सर्व मागण्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करणे ही प्रशासकीय प्रक्रिया असू शकते; मात्र कोळसा प्लॉट हटविण्याच्या थेट मागणीला त्यातून उत्तर मिळत नाही. त्यामुळे लेखी आश्वासन मिळाले असले तरी आंदोलनाचा मूळ प्रश्न आज ही याच धुळीत विरलेला आहे म्हणजेच अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. विशेषतः काही वेळासाठी आंदोलकांना समाधान प्राप्त झाले असते तरीही नागरिकांचा प्रश्न मात्र कायम राहिला आहे तेवढे स्पष्ट झालेलं. आंदोलन संपले पण कोल डेपो तिथेच.

आंदोलनाची दखल घेणे आणि आंदोलकांची प्रमुख मागणी मान्य करणे या दोन वेगळ्या बाबी आहेत.लेखी आश्वासन हा तोडगा नसून तोडग्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. चिखलगावकरांना केवळ चर्चेचे, पत्रव्यवहाराचे आणि पाठपुराव्याचे आश्वासन नको, तर कोळसा प्लॉट हटविण्याबाबत स्पष्ट निर्णय आणि प्रत्यक्ष कार्यवाही अपेक्षित होते . पण आता प्रशासन संबंधित विभागांशी चर्चा करण्यात किती महिने घेत वेळ घालवते आणि कोळसा प्लॉटच्या प्रश्नावर ठोस निर्णय कधी घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.सर्व मागण्यांवर पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन मिळाले; पण ज्या कोळसा प्लॉटविरोधात आंदोलन उभे राहिले, तो प्लॉट तात्काळ हटविण्याचा शब्द मात्र प्रशासनाने दिलाच नाही. म्हणून म्हणून नागरिक आताही “धुळीतच आपले जीवन “काढत असल्याचे खंत आताही व्यक्त केल्या जात आहे. आंदोलन झाले आता साध्य केवळ लेखी “करू” हेच उत्तर मिळालं ठोस उत्तर अद्यापही अनुत्तरीतच आहे. आंदोलनात यश आले की नाही आता हेही जनतेचा हाती याच उत्तर नक्कीच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page