Tuesday, April 21, 2026
HomeBreaking Newsप्रभाग दहा मध्ये "मीनाक्षी राजू साठे" मैदानात...!

प्रभाग दहा मध्ये “मीनाक्षी राजू साठे” मैदानात…!

•महिला शक्तीचा नवा चेहरा,जनतेत उत्साह.

Ajay Kandewar,Wani : नगरपरिषद निवडणुकीचा ताप वाढत असताना प्रभाग क्रमांक 10 मध्ये मीनाक्षी राजू साठे यांनी आपल्या जयत तयारीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शांतपणे पण ठामपणे जनतेच्या मनात स्थान निर्माण करत, “विकासाची नवी दिशा नागरिकांसाठी खरी सेवा” या घोषवाक्यासह त्या मैदानात उतरल्या आहेत.

स्थानिक स्तरावर रस्ते, पाणी, स्वच्छता आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण यावर साठे यांचा विशेष भर आहे. त्यांनी आपल्या प्रभागात केवळ समस्या दाखवून न देता त्यावर उपाययोजना सुचवून ‘करून दाखवणारे नेतृत्व’ असा विश्वास निर्माण केला आहे.महिला सक्षमीकरण, युवतींसाठी रोजगार संधी आणि सर्वसामान्यांसाठी पारदर्शक प्रशासन हा त्यांचा मुख्य अजेंडा असून, नागरिकांशी थेट संवाद साधत त्या घराघरांत पोहोचत आहेत.निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये मीनाक्षी राजू साठे यांचे नाव आता चर्चेचा विषय ठरले असून, त्यांचा आत्मविश्वास आणि जनतेचा प्रतिसाद पाहता हा प्रभाग महिला नेतृत्वाचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाला आहे.वणीच्या नगरराजकारणात “विकासाच्या बिगुलाची नवी धून आता मीनाक्षी साठे यांच्या नावाने घुमतेय.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page