Ajay Kandewar,Wani Assembly Pole:- वणी विधानसभा निवडणूक महायुती तसेच महाविकास आघाडीला देखील जरा कठीण जाणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. याचे कारण म्हणजे उमेदवारीसाठी वाढलेली नेत्यांची बंडखोरी होय. वणी काँग्रेसच्या गड बालेकिल्ला पंज्याविणा दिसत आहे. त्यामुळं जनतेच्या मनातील असणारे संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी लढविण्याचा निर्णयाने सर्वच पक्षाचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
वणी मतदारसंघात “जायंट किलर”ठरलेले मविआ अधिकृत उमेदवार यांना काँग्रेसच्या गड राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ते कामाला लागले आहेत. मात्र, त्यांच्यापुढे पक्षांतर्गत बंडखोरांचं आव्हान आहे. काँग्रेसचे नेते संजय खाडे यांनी बंड केल्यामुळे त्यांना पक्षांतर्गत फटका बसण्याची शक्यता अटळ आहे. कारण काँग्रेसचा एक गट खाडे यांचाशी खांद्याला खांदा लावून असल्याने खाडे यांना अंतर्गत गटबाजीने निवडणूक जिंकणे सहज सोपं जाऊ शकते. वणी मारेगाव व झरी तालुक्यात खाडे विषयी नवीन कुणबी चेहरा, अत्यंत शांत व गरजूंना धाऊनी जाणारा एक नेता म्हणून सहानुभूती असल्याचे सद्याच चित्र दिसत आहे.
“वणी विधानसभा मतदारसंघात यंदा उबाठा गटाला उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे नेते खाडे नाराज झाले होते. परंतु त्यांची मनधरणी करण्यात आली.काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा भेटी दिल्या; मनधरणी करण्यात संजय देरकर यांना यश आलें. परंतु काहीं नाराज नेते, दुखावलेले नेते धर्म पाडणार मात्र गड राखण्याचा तयारीत असल्याची स्पष्ट चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची संकेत आहे.”