Saturday, May 9, 2026
HomeBreaking Newsमहाराष्ट्रात "राज"ची पहिली सभा वणीत......!

महाराष्ट्रात “राज”ची पहिली सभा वणीत……!

•राज ठाकरे मविआ व महायुती यांचा समाचार घेणार?  •सायं.६ वाजता सभेत तुफान गर्दीचे संकेत.

अजय कंडेवार,Wani:- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असुन सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार तोफा राज्यात धडाडणार आहेत. यामध्ये सद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी घेत विदर्भात पहिली प्रचार सभा वणी विधानसभा मतदार संघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोज मंगळवार ला सायंकाळी ५ वाजता शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे आयोजन करण्यात आले आहे.

वणी मतदारसंघात मनसेचे उमेदवार राजू उंबरकर हे आहेत. मनसेच्या वाघ आज वणीत काय बोलणार याकडे समस्त वणी विधानसभेचा जनेतेचे लागले आहे.मात्र मनसेच्या विरोधात भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे मविआ की महायुतीचा यापैकी कोणाचा समाचार घेतात ? याकडे विशेष लक्ष लागले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page