Ajay Kandewar,Wani:- वणी उपविभागातील समस्त शेतक-यांच्या शेतीपंपाना सिंचनासाठी पुढील 3 महिने २४ तास विजेचा पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी दि 28 ला शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी उपविभागीय अभियंता म.रा.वीज वितरण कंपनी वणी यांना निवेदन दिले.
रब्बी हंगामात विजेच्या अनियमित वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे खरिपानंतर रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. सात दिवस रात्री आठ तास, तर सात दिवस दिवसा आठ तास कृषी पंपासाठी वीज दिली जाते. परंतु दिवसा वीज टिकत नाही, तर रात्री थंडीमुळे पाणी देता येत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून केली जात आहे.मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे पावसाने नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. खरिपातील खर्च निघेल इतके उत्पादन झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहेत.
शेतपिकांच्या सिंचनाची गैरसोय होत आहे. तरी ती गैरसोय टाळण्यासाठी शेतक-यांना दररोज पुढील तिन महिने २४ तास विजेचा पुरवठा करण्यात यावा जने करून शेतक-यांना रब्बी पिके चंगल्या पंध्दतीने घेता येईल. नाहक त्रास न देता मागणीची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय निखाडे यांनी निवेदनातून दिला. यावेळी सुधीर थेरे, विलास बोबडे, प्रवीण खानझोडे आदि उपस्थित होते.