Tuesday, July 15, 2025
HomeBreaking Newsवणीत काँग्रेसला पडणार खिंडार; "एक मोठा नेता" घर वापसीचा वाटेवर.....!

वणीत काँग्रेसला पडणार खिंडार; “एक मोठा नेता” घर वापसीचा वाटेवर…..!

शेकडो कार्यकर्तेही व नाराज पदाधिकारीही संपर्कात. •काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर येणार?

Ajay Kandewar,Wani:- यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अनेकजण पक्ष सोडणार असल्याची खमंग चर्चा सूरू झाली आहे.काँग्रेसचा मोठ्या नामवंत नेतृत्वाने वेळोवेळी डावलत असल्याने कदाचित काँग्रेस पक्षावर उघड नाराजी व्यक्त केलीय. अश्या बाबतीची वणी मतदार संघात सध्या ओरड सूरू आहे.

काँग्रेसच्या नामवंत तसेच सोबत शेकडो कार्यकर्त्याची फळी असणारा ” तो मोठा नेता” राष्ट्रवादीचा वाटेवर आहेत. विशेष म्हणजे तो काँग्रेसचा नेता मंत्री धनंजय मुंढे यांचे निकटवर्तीय असल्याचेही समजते. काँग्रेस पक्षात मिळणारी वागणूक बघता “तो नेता” घरवापसीचा तयारीत असल्याची माहिती जाणकरांकडून मिळत आहे. राष्ट्रवादीचा एका मंत्र्यानी त्यांना यवतमाळ जिल्हा तसेच वणी मतदारसंघाचा विकासाबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.त्यामुळं त्यांनी कदाचित काँग्रेसमध्ये चालणारी अंतर्गत गटबाजी व वागणुकिमुळे कंटाळलेल्या “या नेत्याने” हा निर्णय घेत असल्याचेही कळत आहे. परंतू हा “मोठा नेता “जर “घरवापस” करीत राष्ट्रवादीत एन्ट्री झाली तर त्यासोबत असणारी कार्यकर्त्यांची मोठी फळी देखील प्रवेश घेण्याची दाट शक्यता आहे. यावरून काँग्रेसला आणखी एक मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. विशेषतः काही नाराज काँग्रेसचे पदाधिकारीही “त्या मोठया नेत्याचा “ संपर्कात असल्याचीही चर्चा काँग्रेस गोट्यातूनच ऐकावयास मिळत आहे. जर असे झाल्यास काँग्रेस आधीच गटा गटात विभागली असून या धक्याने आणखी काँग्रेस वणी मतदासंघांत “फुस्स “होणार का? हे देखील पाहणे तेव्हढेच सत्य आहे.

•त्याच नामवंत काँग्रेस नेत्याने गावागावांत पोहचविली राष्ट्रवादी…… म्हणून पुन्हा एकदा सत्तेत असणाऱ्या एका मोठया मंत्र्याने टाकला विश्वास……..

“काहीं वर्षापूर्वी राज्यस्तरावरचे पद ही त्या नेत्याला देण्यात आलले होते. त्यामुळं ते वणी क्षेत्रात जोमानं कामाला लागलेही होतें.त्याच “मोठया नेत्याने “गावागावांत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. हे करत असताना पक्षाकडून कोणतीही अपेक्षाही ठेवली नाही. आता वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा गावोगावी लावण्याचा प्रयत्न केला म्हणून पुन्हा एकदा “सत्तेत असणाऱ्या” एका मोठया “मंत्र्याने” विश्वास टाकल्याची विश्वसनीय माहिती आहे. यावरून परत वणी तालुक्यात एक मोठा पक्ष म्हणून परत नव्या जोमाने उदयास येईल यात शंका नाही.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments