अजय कंडेवार,Wani :-तालुक्यातील राजूर (इ) येथिल समस्त ग्रामवासियांच्या वतीने विदेही सद्गुरू श्री. जगन्नाथ महाराज शंकरपट बैल गाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. राजूर येथील चंद्रभान राजूरकर यांच्या शेतात आयोजित केलेला शंकरपट पुढील ३ दिवस चालु राहणार आहे. तर या स्पर्धेत राज्यातील शेकडो बैलगाड्यांचे मालक या सहभागी होणारं आहे.आज या शंकरपटाचे उद्घाटन मनसे नेते राजु उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उंबरकर यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून सन्मान केला तसेच उंबरकर यांनी सर्व शेतकरी बांधव आणि स्पर्धकांना शुभेच्छा देत खेळाचा आनंद लुटला.Shankarpat is a happy moment for farmers.Many contestants from the state will participate
राजुर येथील शंकर पटास अनेक वर्षांची परंपरा असून मध्यंतरी शासकीय निर्णयामुळे हा खेळ बंद पडला होता. परंतु मनसेचे नेते राजु उंबरकर यांच्या पुढाकारातून गेल्या वर्षांपासून या ठिकाणी या खेळाचे आयोजन करण्यात येत आहे. गत वर्षात या स्पर्धेला बैलगाडा मालकांचा उस्फुर्त प्रतिसाद पहावयास मिळाला होता. विजयी स्पर्धकांना आकर्षण बक्षिसांची मेजवानी सुध्दा होती. याच धर्तीवर यावर्षीचे आयोजन असुन प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यास व अन्य इतर रोख रक्कमेचे बक्षिसे आयोजकांकडून देण्यात येणारं आहे.शंकर पटावरील बंदी उठल्याने अनेक शेतकरी बांधवांनी यात सहभाग घेतला असून शंकर पटाच्या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. बैलांचा शंकर पट मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांसाठी शंकर पट हा पटाचा कार्यक्रम आनंददाई तसेच उत्साह निर्माण करणारा आहे.पटामुळे बैलांची जोपासना होते, त्यांचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे उंबरकर यांनी सांगितले. Shankarpat
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, सरपंचा विद्या पेरकावार, मनसे महीला सेनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, वैशाली तायडे, वामन पाटिल बलकी, शिवराज पेचे, रविंद्र वांढरे, विलन बोदाडकर, महादेवराव तेडेवार, गुड्डू वैद्य, शुभम भोयर, मनीषा ढवस, लता मरापे, रमेश मिलमिले, हरीदास पाटिल मिलमिले, चंद्रभान राजुरकर, संस्कार तेलतुंबडे आयोजक समितीचे अध्यक्ष सोमेंश्वर ढवस, अशोक मिलमिले, अनिल मरापे, सतीश वांढरे, दिनेश बलकी, सचिन तेडेवार, युवराज कुळसंगे यांच्या सह उपस्थित बैलगाडा चालक – मालक व गावकरी उपस्थित होते