Sunday, August 16, 2026
HomeBreakingमाजी जि.प. सदस्य विजय पिदूरकरांसह मोहदा सरपंच व उपसरपंच यांचा पाठपुराव्याला यश.......

माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकरांसह मोहदा सरपंच व उपसरपंच यांचा पाठपुराव्याला यश…….

Ajay Kandewar,Wani : तालुक्यातील वणी–शिरपूर–आबाई फाटा– वेळाबाई– मोहदा– कृष्णानपूर–तृंड्रा–नेरड–मुकुटबन या मार्गावरील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली एसटी बससेवा अखेर १७ ऑगस्ट २०२६पासून पुन्हा सुरू होत आहे. बससेवा बंद असल्याने या मार्गावरील विद्यार्थी व नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेत खर्चिक प्रवास करावा लागत होता. वेळाबाई फाटा ते मोहदा–कृष्णानपूर रस्ता नादुरुस्त असल्याने बससेवा सुरू करण्यात अडचणी होत्या. रस्ता दुरुस्त झाल्यानंतरही सन २०२५–२६ मध्ये बससेवा सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय कायम होती.

बससेवा पूर्ववत करण्यासाठी मोहदा ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा राजुरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर तसेच संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून बससेवा सुरू करण्याची आग्रही मागणी केली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, सन २०२६–२७ या शैक्षणिक सत्रात या मार्गावर एसटीच्या सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता अशा दोन फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page