अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत मोहदा येथील रहिवासी असलेल्या एका ४२ वर्षीय इसमाने घरीच घराच्या छताला ओळणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.शुक्रवार १५ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आदूराम सुंदरलाल किलो वय ४२असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.Suicide threat… again one hanged himself.
वणी तालुक्यातील मोहदा येथील आदूराम सुंदरलाल किलो वय ४२ वर्ष हा गावातच रोजमजुरी म्हणून ट्रॅक्टर चालकाचे काम करीत होता.सायंकाळीं कामावरून येऊन याने १५ मार्च शुक्रवार रोजी रात्री ९ वाजताचा दरम्यान राहत्या घरी छताला ओळणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळ गाठून पंचनामा करीत नातेवाईकांनी वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता,डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे ठेवण्यात आले . त्याचा पाठीमागे पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही कळू शकले नाही.पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.Suicide threat… again one hanged himself