अजय कंडेवार,Wani:-
आगामी लोकसभा निवडनुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी साठी इच्छुकांची काँग्रेसमध्ये गर्दी उसळू लागली होती. भाजप व कांग्रेस पक्षात उमेदवारीसाठी सध्या जिंकू किंवा मरु असे वातावरण तयार झाले होते परंतु चंद्रपूर लोकसभा खासदार धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी पक्ष श्रेष्ठीने आमदार प्रतिभा बाळू धानोरकर यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले होते, जर कुटुंबातील राजकीय पदावर असलेल्या नेत्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला त्या जागेचे तिकीट मिळते, अशी परंपरा कांग्रेस पक्षात आहे. Chandrapur Lok Sabha Congress Candidate त्याअनुषंगाने आमदार धानोरकर यांनी तयारी सुद्धा केली मात्र अचानक विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी कांग्रेस पक्षाला चंद्रपूर लोकसभेचे तिकीट मागितले.त्यातच कालपर्यंत सुभाष धोटे यांना उमेदवारी फिक्स झाल्याचे बोलल्या जात होतें.पण शेवटी ताई तिकिट फिक्स झाल्याची चर्चा सूरू झाली.Chandrapur Lokbha “Congress” ticket final pratibha balu Dhanorkar.
तिकिटांची मागणी केल्यावर शिवानी वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात तसे वातावरण सुद्धा तयार करायला सुरुवात केली, मात्र मुंबई येथे झालेल्या पक्ष श्रेष्ठीच्या बैठकीत आमदार धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले.मात्र असे असताना सुद्धा शिवानी वडेट्टीवार यांनी आपण लोकसभा लढविण्यास इच्छुक आहे असे विधान शेवटच्या क्षणा पर्यंत कायम ठेवले, ज्यामुळे कांग्रेस पक्षात पुन्हा धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष पुढे आला होतें.काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या चार आमदारांसह माजी आमदारांना मुंबईत मागिल १० दिवसाआधी बोलावून घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात नुकतीच प्रदीर्घ चर्चा केली होती. लोकसभा जिंकायची असेल तर पक्षाने ओबीसी, बहुजन किंवा कुणबी समाजाचा, तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातीलच उमेदवार द्यावा, बाहेरचा उमेदवार लादू नये अशी साद आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे घातली. दरम्यान, या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना या बैठकीसाठी आमंत्रित न केल्याने वडेट्टीवारांची कन्या आणि महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांच्या समर्थकांसह थेट दिल्ली गाठत ठीय्याच मांडला होता. शिवानी वडेट्टीवार या चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी अथक प्रयत्न करत होत्या.
माञ चंद्रपूर जिल्ह्यात OBC समाज मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून आमदार धानारकर याचा कांग्रेस पक्षाने उमेदवारी पूर्णतः फायनल केली आहे. आमदार प्रतिभा बाळू धानोरकर यांचं नावं काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या सभेनंतर अखेर तिकीट जाहिर करण्यात आले.तत्कालीन खासदार बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं नसत तर आज जे कांग्रेस पक्षात राजकीय वातावरण तापलेले होतें ते पूर्णतः थंड अवस्थेत दिसलं असतं, काहीही असो येणारी लोकसभा निवडणुक चंद्रपुरात अटीतटीची असणार पण सर्वात जास्त महत्वाची लोकसभा जागा ही चंद्रपूरची असणार हे विशेष, कारण 4 वेळा खासदार व केंद्रात मंत्री असलेले हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ बाळू धानोरकर यांनी चाखायला लावली होती, राज्यात एकमेव कांग्रेस खासदार हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते. आता या निवडणुकीत” ताई ” आणि “भाऊ “यांच्यात काते की टक्कर होणार यात माञ शंका नाहीं.जातीय समीकरण, पतीच्या निधनबद्दल आपुलकी आणि खासदाराच्या निधनानंतर लोकसभा क्षेत्रातील त्यांचा झंझावात यामुळे प्रतिभा धानोरकर यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळाल्याने भाजपा उमेदवार तथा राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही निवडणुक जड जाण्याची शक्यता आहे.