अजय कंडेवार,वणी:-भर उन्हामध्ये लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापु लागले आहे. पुर्वी राजकीय पक्ष व नेत्यासाठी मरणे मारण्यास मागे पुढे न पाहणारे कार्यकर्ते आता सावध भूमिका घेवु लागले आहे. ते केवळ नेत्यांच्या दुपटी धोरणामुळेच, म्हणुनच तर लोकसभा निवडणुकीकरीता प्रत्येक राजकीय पक्षांच्या उमेदवार व नेत्यांना कार्यकर्त्यांची वनवा भासु लागली आहे. निवडणुका आल्या कि उमेदवार व नेत्यांना आपली आठवण येते म्हणुन कार्यकर्ते सुध्दा भाव खाउ लागले आहे.
कार्यकर्त्यांच्या मुंड्या दाखवुन उमेदवाराकडुन बंडले मोजुन घेणाऱ्या संधीसाधु नेत्यांना आता कार्यकर्ते कैचीत पकडतांना दिसुन येत आहे. प्रचाराच्या गाडीत बसण्यापुर्वीच रात्रीची संपूर्ण सोय तेही नगदी मध्ये करुन घेण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिल्याचे दिसुन येते. त्यामुळेच कि काय आज या तर उद्या दुसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार वाहनात कार्यकर्ते दिसु लागले आहे. खासदार, आमदार, नेते मंडळी आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात तर कार्यकर्त्यांनी आज या तर उद्या दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचार वाहनात का बसु नये, त्यांचा पार्टीत का जाऊ नये? असा उलट प्रश्न सुध्दा कार्यकर्ते करु लागले आहे.