अजय कंडेवार,Wani : आजी आजोबांकडे राहत असलेली अल्पवयीन नात घरून बेपत्ता झाली. ६० वर्षीय आजोबांनी १४ एप्रिल रोजी वणी पोलीस स्टेशन गाठून त्यांची अल्पवयीन नात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.A minor granddaughter who lives with her grandparents is missing from home
बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी शहरालगत एका गावात आपल्या आजी आजोबांकडे राहून शहरातील एका शाळेत ९ व्या वर्गात शिक्षण घेत होती. नुकतीच परीक्षा संपल्यामुळे ती घरीच राहायची. १३ एप्रिल रोजी जेवणं करून रात्री १० वाजता मुलगी आजीच्या बाजूला झोपली होती. रात्री ११ वाजता दरम्यान आजीची झोप उघडली असता तिला बाजूला झोपलेली नात दिसून आली नाही. आजीने आपल्या नवऱ्याला उठवून नात घरात नसल्याची माहिती दिली. दोघांनी तिचा शोध घेतला मात्र पदरी निराशा पडली. शेवटी मुलीच्या आजोबांनी अल्पवयीन नातला कुणी तरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये दिली. तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.