अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील मोहदा परिसरात संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. पावसाळयाला सुरुवात होताच नागरिकांमध्ये कीटकजन्य आजाराचे लक्षणे दिसू लागली. यात तापाचे रुग्ण ही वाढू लागले. गेल्या काही दिवसांमध्ये रूग्णांची वाढती संख्या येथील नागरिकांना धोकादायक ठरत होती. त्यामुळे शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र व मोहदा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करीता मोफत आरोग्य शिबीर व धूर फवारणी कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली .Public awareness in the village in association with Mohda Gram Panchayat and primary health Center
पावसाळी आजाराने नागरिकांना धोका निर्माण झाल्याने मोहदा ग्रामपंचायतीतर्फे गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेतंर्गत परिसरातील सर्वच ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले तसेच शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध आजारांच्या रुग्णांची तपासणी करणे, दररोज संक्रमित झालेल्या रुग्णांची तपासणीचे नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून साथीच्या रोगांची संख्या जास्त वाढल्याने नागरिकांसोबतच प्रशासनाचीही चिंता वाढली होती दरम्यान साथीचे आजार डोकेवर काढले ताप, थंडी, खोकला यासह विविध आजारांच्या तपासण्या करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी होत होती.त्यामुळं शिरपूर आरोग्य केंद्रातील संपूर्ण कर्मचारी रुग्णांना सेवा देत मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी व इतर सामान्य आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या मोफत आरोग्य तपासणीत अनेकांना औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये 70 लोकांचे महिला व बालके, पुरुष यांच्या तपासण्या केल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी पावसाळी आजारामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करावी, असे पत्र मोहदा ग्रामपंचायतीला प्राप्त झाले तसेच आशा वर्करच्या माध्यमातून गृहभेटी वाढवून परिसरातील नागरिकांना आजारासंदर्भातील माहिती देण्यात आली. ताप आलेल्या रुग्णांना रक्त तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. दरम्यान मोहदा ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तत्काळ गावात धूर फवारणीला सुरुवात करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. बलकी ,रोशनी बागडे, सुखदेवे, करण ब्रामने, सतीश डंबारे यांचे सहकार्य लाभले तसेच कविता वनकर, सविता कास्तकार, रेश्मा वनकर तर सरपंच वर्षा राजूरकर, उपसरपंच सचिन रासेकर ,सर्व सदस्य व कर्मचारीवृंद यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.