अजय कंडेवार,Wani:– तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीने उच्छाद माजवीला असून चक्क तालुक्यांतील “विदर्भा नदी पात्रातून” उपसा करून रेती चोरटयांनी अवैध रेतीची साठवणुक केल्याची खमंग चर्चा सूरु असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात घर बांधनी सुरू असुन यासाठी प्रचंड प्रमाणात रेतीची गरज भासते. तुर्तास तालुक्यातील रेती घाट बंद असल्याने रेती मिळेनाशी झाली आहे. परिणामी रेती तस्करांची पुरती चांदी असुन तालुक्यांतील “त्या “गावच्या आजूबाजूला अव्वाच्या सव्वा दराने अवैध रेती विक्रीला उधाण आले आहे.तालुक्यातील गाव गोट्यात मोठ्या प्रमाणात घर बांधनी सुरू असुन यासाठी प्रचंड प्रमाणात रेतीची गरज भासते. दरम्यान अवैध रेतीची साठवणुक करण्याकरिता रेती तस्करांनी चक्क “एका शेता”पर्यंत मजल मारीत “एका पळीत शेतीचा “आधार घेतल्याचे दिसत वास्तव आहे.
रेती चोरटयांनी अवैध रेती साठवणुकी करिता चक्क “शेतातील” जागेचा आधार घेतल्याने प्रशासन सदर बाबीबद्दल अनभिज्ञ आहे की याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे…? असा खोचक सवाल जनता जनार्दनातुन आता उपस्थित होऊ लागला आहे. तरी याचाही पर्दाफाश “विदर्भ न्युज” करेलच.. आणि तो रेती साठा जप्त देखिल करण्याकरीता पाऊल उचलेल.