अजय कंडेवार,Wani:- पावसाळ्यात साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायर (ता. वणी) येथील ग्रामपंचायत सरपंच नागेश घनकसार यांनी पुढाकार घेत जंतूनाशक फवारणीची मोहिम हाती घेतली.
सध्या ताप,सर्दी,खोकला, डेंग्यू व मलेरिया या साथीच्या आजारांची साथ शहरासह गावातही पसरत आहे.गावात देखील काही रुग्णांमध्ये ती लक्षणे दिसून आल्याने साथीचे आजार रोखण्यासाठी सरपंच घनकसार यांनी पुढाकार घेत उपाययोजना करण्यात येत आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्त तपासणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत मार्फत देण्यात आल्या. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जंतूनाशक फवारणी व टीसीएल पावडर टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थांना या आजाराचा सामना करावा लागू नये, यासाठी ग्रामपंचायत सर्व तयारी करणार असल्याचे सरपंच नागेश घनकसार यांनी सांगितले.