अजय कंडेवार,वणी :- विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन बळकट करण्यावर भर आहे. सध्या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने या कामाला अधिक वेग आला आहे. सध्या घरोघरी शिवसेनेचा भगवा सप्ताहमुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा झुंजाररीत्या दौरा देखिल सुरु आहे आणि नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तरुणाई व विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत येत आहे.”Bhegavema” atmosphere in the Wani Assembly
याचाच एक भाग म्हणजे विधानसभा क्षेत्रातील शिरपूर भागात भगवा सप्ताहाचे माध्यमातून सेनेचा वाघ समजले जाणारे संजय देरकर यांनी कुरई,गोवारी पारडी, ढाकोरी मूर्ती बोरी या गावात जाऊन जागतिक आदिवासी दिन साजरा करीत दिनाचे महत्त्व आदिवासी बांधवांना तथा नागरिकांना पटवून दिले .प्रत्येक गावात संजय देरकर यांचा सत्कार करण्यात आला. विशेषतः भगवान क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, श्याम दादा कोलाम, राणी दुर्गावती यांच्या कार्याला उजाळा दिला.
या कार्यक्रमाला संतोष माहुरे,दीपक कोकास,रवी बोडेकर,डीमन टोंगे ,पुष्पा भोगेकर,चंदा मून, अजिंक्य शेंडे,संजय देठे, मंगेश मत्ते, प्रशांत बल्की, भगवान मोहिते, डॉ जुनगरी, लोकेश्वर बोबडे, विठ्ठल बोंडे,अजय कौरासे,योगीराज आत्राम,विठ्ठल ठाकरे, राजू झाडे, कवडू उईके, विनोद कुडमिते, अनिल उईके, मोरेश्वर किनाके, सुभाष उईके, आकाश आसुटकर, विकास धगडी हे उपस्थित होते तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र इददे यांनी केले.