अजय कंडेवार,Wani:- “हर घर नल से जल” या तत्त्वावर आधारलेल्या केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनमध्ये प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदारांचेच चांगभले होत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या कायर येथे जलमिशन अंतर्गत ४५ लाखांच्या निधीतून पाणीपुरवठा योजना उभी होत आहे.Gaudbangal of “that” contractor in “Kayar” village…
2023-24 मध्ये वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार बोदकुरवार यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते. टाकीचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत एकही स्लॅब पडला नाही.मात्र, एक ते दिड वर्षापासुन काम सुरू झाले असताना देखिल कामाची कासवगती जनतेच्या संयमाची परिक्षा घेणारी ठरत आहे.कंत्राटदारांना खरे तर काम पूर्ण करण्यासाठी विहित कालावधी देणे अपेक्षित असते. त्याचबरोबर काम तांत्रिक व आर्थिक मापदंडानुसार करून घेणे अनिवार्य ठरते. मात्र, वणी तालुक्यातील अनेक कामांमध्ये गौडबंगाल आहे. गुणवत्तेचा व कामाचा सबंध किती, हाच चर्चेचा विषय असून टक्केवारीचे सूत्र प्रत्येक ठिकाणी कायम आहे.जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिमानसी ५० लीटर शुध्दपाणी पुरविण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे.
केंद्राने त्यासाठी यवतमाळसारख्या जिल्ह्यात हजारो कोटींचा निधी जवळपास १७३८ गावांतील योजनांकरिता दिला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेपासूनच या योजनेत टक्केवारीतून मर्जीन कसे मिळेल, या हेतूने कामे सुरू झाली आहे.त्याचप्रमाणे वणी परिसरात या योजनेच्या कामामध्ये अनियमितता वाढल्या आहे. कारण या ठेकेदार कडे जवळपास 17 गावातली कामे अश्याच प्रकारे अपुरे आणि निकृष्ट असल्याची जनतेतून ओरड सुरु आहे.सध्यातरी या कायर या गावातील गुणवत्तेचा व कामाचा बट्याबोळ सुरु आहे यात माञ शंकाच नाही. सध्यातरी गावात याबाबत नाराजी आहे . माञ गावचे आते – नेते , पांढरपोशी तसेच ग्रापंचायत हे याकडे पाहून गप्प कसे हे कोडच अनुत्तरीत आहे.
प्रतिनिधी बोलताना उडवाउडवीची उत्तरे कत्राटदार यांनी दिली की, “माझ्याकडे एकाच गावच कामं नाही तर 17 गावचे कामे आहे.मागील अनेक महिन्यांपासून बील निघाले नाही. म्हणून कामे अपूर्ण आहे”.- कंत्राटदार