अजय कंडेवार,Wani:- शिंदे-फडणविस- अजीत पवाराचे सरकार पुन्हा आले तर शेतकरी कष्टकरी व सामान्य जनतेला जगने कठिन होईल हा विचार करित पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेत संभाजी ब्रिग्रेड पक्षाने ठाकरे युती तुटल्यानंतर संजय देरकर यांना पाठिंबा देण्याची भुमिका जाहिर करित खोके सरकारला हद्दपार करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे याप्रसंगी सांगितले.
संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार अजय धोबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत वणी विधानसभेत मविआ चे संजय देरकर यांना संभाजी ब्रिगेडच्यावतीने जाहिर पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संभाजी ब्रिगेडचे अमरावती विभागीय अध्यक्ष अनंत मांडवकर, अजय धोबे ,अशोक चौधरी ,अंबादास वागदरकर ,आशिष झाडे, लहु जिवतोडे,वसंता थेटे,आशिष रिंगोले,अमोल टोंगे, सुरेंद्र घागे, संजय गोडे, अमोल लोखंडेअभय पानघाटे,नितेश ठाकरे , प्रमोद लडके अनामिक बोढे व देव येवले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप रिंगोले यांनी केले तर संचालन दत्ता डोहे यांनी केले .
संभाजी ब्रिगेडची उद्धव ठाकरे सोबतची युती तुटली पण……
“उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी घटक पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड हा पक्ष सोबत होता परंतु विधानसभेचा काळात सीट वाटपाचा गोंधळ ऐन वेळी झाल्याने संभाजी ब्रिगेडचा आशा निराशेत बदल झाले व सरतेशेवटी ठाकरे सोबतची युती तुटली. वणी विधानसभेतून संभाजी ब्रिगेड तर्फे अजय धोबे यांनी नामांकन केले व शेवटचा दिवशी मागें घेतं Sanjay Derkar यांना पाठिंबा जाहिर केला.” कारण मविआ मधला पक्ष जो ठाकरेशी युतीतून बाहेर आला आणि ठाकरेचाच उमेदवाराला पाठिंबा दिला हा व्यक्तिगत की वरिष्ठांचे आदेश अद्यापही लेखी पत्र कोणत्याही पत्रकारांना “आदेश पत्र”स्वरूप प्राप्त झाले नाहीं. तरीही संजय देरकर यांचे खंबीर उमेदवारी बघता या निर्णयांचे स्वागत ही वणी विधानसभेतून केलें जात आहे