Vidharbh News -अजय कंडेवार,वणी:- चंद्रपुर-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जाहिर प्रचार सुरु झाला आहे. त्याआधी निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांच्या मुख्य कार्यकर्त्यांनी समाजा, समाजाच्या बैठका घेण्यावर भर दिल्याचे दिसुन येत आहे.
शहरात गेल्या काही दिवसापासुन विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची रेलचेल वाढली आहे. चार ते पाच जणांच्या ग्रुपसह ते कार्यकर्ते विविध समाजाच्या बैठका घेवुन त्यांची मने जाणुन घेण्याचा प्रयत्न करतांना दिसुन येत आहे. लोकसभा निवडणुकीचा जाहिर प्रचार सुरु झालेला असून प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मतदारांच्या भेटी घेण्यावर भर देण्यात येत आहे. प्रचाराची सुरुवातच समाजा, समाजाच्या बैठका घेवुन करण्यात येत असल्याने हि निवडणुक जातीवर आधारीत तर होणार नाही ना? असा प्रश्न सुज्ञ मतदारातुन उपस्थित करण्यात येत आहे.
सदर निवडणुक विकासाच्या मुद्यावर व्हायला पाहिजे असतांना ती जातीवर जात असल्याचे सद्यातरी दिसुन येत आहे. निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांचे चंद्रपुर येथील कार्यकर्ते तथा नातेवाईकांनी शहरातील विविध भागात समाजा, समाजाच्या तथा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बैठका घेण्यावर भर दिल्याचे दिसुन आले. विशेष म्हणजे या बैठका घेत असतांना त्या उमेदवारांच्या कार्यकर्ते व नातेवाईकांनी आपल्या राजकीय पक्षाच्या स्थानिक कोणत्याही नेत्यांना सोबत घेतले नव्हते हे विशेष.
🟢गावखेड्यात रंगताहेत अशीही चर्चा….
“मागील पाच वर्षाअगोदर 40 हजाराचा वर मतांनी अहिर”यांना पराभूत करून बाळुभाऊ धानोरकर यांनी बाजी मारली होती तेव्हापासून ‘चंद्रपूर लोकसभेचा’ विकास झाला का? हे सुद्धा मतदार लक्षात ठेवेल का? आता ही लोकसभेचा विकास होईल की”स्वतःचा” होईल मतदारांनो आत्ताच ठरविणे गरजेचे… फक्त समाज -समाज करून चालणार नाही तर लोकसभेत किती रोजगार प्राप्त झाले, किती सोयी सवलती नागरिकांना मिळाले ,याकडे जनतेने लक्ष देत निर्णय व्हायला पाहिजे, अशी खमंग चर्चा गावखेड्यात होत आहे.”