Saturday, May 2, 2026
HomeBreakingवणीच्या पत्रकाराची लेक नागपूर G.S.कॉलेजमध्ये झळकली.....

वणीच्या पत्रकाराची लेक नागपूर G.S.कॉलेजमध्ये झळकली…..

Ajay Kandewar,Wani :- वणी शहरासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील धडाकेबाज आणि सर्वांसोबत जिव्हाळ्याने वावरणारे पत्रकार दिलीप भोयर यांची एकुलती एक मुलगी निर्मिती भोयर हिने बारावी परीक्षेत तब्बल 95 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.निर्मितीने नागपूर येथील G.S. कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत शिक्षण घेतले. गेल्या दोन वर्षांपासून घरापासून दूर राहून तिने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन आणि स्वतःवरचा विश्वास यामुळेच तिने हे यश गाठले.

विशेष म्हणजे, निर्मितीचे पुढील ध्येयही तितकेच मोठे आहे. तिने C.S. (Company Secretary) होण्याचे स्वप्न पाहिले असून, ते पूर्ण करण्यासाठी ती पुढील वाटचाल करणार आहे. तिच्या या ध्येयवेडेपणामुळे ती आणखी उंच शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

निर्मितीच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण वणी शहराचा मान उंचावला आहे. पत्रकार क्षेत्रात अनुभवी असलेल्या दिलीप भोयर यांच्या संस्कारांचा आणि मार्गदर्शनाचा तिच्या यशात मोठा वाटा आहे.आपल्या यशाचे श्रेय निर्मितीने नम्रपणे आपल्या आई-वडील आणि गुरुजनांना दिले आहे. “त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले,” असे ती म्हणाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page