Vidharbh News -अजय कंडेवार,वणी:- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वणी विधानसभा प्रमूख संजय देरकर यांच्या नेतृत्वात तसेच युवासेनेचे यवतमाळ उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या मार्गदर्शनात देरकर निवासस्थानी झरी तालुक्यातील लिंगटी गावातील माजी सरपंच, आजी -माजी सदस्य व अनेक तरुणांनी हिंदू जननायक स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय भवानी… जय शिवाजी च्या घोषणेने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
वणी विधानसभेत झरि तालुक्यातील लिंगटी हे गाव विद्यमान आमदार बोदकुरवार यांचे आहे.ऐन लोकसभा निवडणुकीचा काळात अनेक राजकिय बदल व्हायला सुरूवात झाली आहे.विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे वाढत असलेला ओघ आगामी काळात संघटन मजबुतीचा पाया भक्कम करणारा आहे.झरी तालुक्यातील आणखी अनेक उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झाली असून येत्या काळातही प्रवेश करणार असल्याचे उपस्थितानी सांगितले.
🟢बाळासाहेबाच्या विचाराने प्रेरित झालोत तसेच संजय देरकर यांच्या नेतृत्व आवडले.
“यावेळी पवन काळे यांनी बोलतांना सांगितले की,हिंदुत्वाच्या हक्कासाठी लढणारी ही शिवसेना असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण शिवसेनेत आलो. आमच्यावर बंडखोर म्हणून टिका केली जात असली तरीही, आम्ही कुठे बंड केले आहे, आम्ही हुकूमशाही विरोधात लोकशाही या विचारानेच सामोरं आलो आहोत. आमचा हा उठाव आहे.”
यावेळी वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर ,संतोष माहुरे, संजय निखाडे, दीपक कोकास, शरद ठाकरे, रवि बोधेकर, सुधीर थेरे, संजय देठे, विनोद ढुमने, भगवान मोहिते, चेतन उलमाले, रोशन काकडे, तेजस नागतुरे यांचा उपस्थितीत पवन लक्ष्मण काळे,जगदीश बद्द्मवार ,ब्रम्हानंद येलटीवार,अमोल येडमे,राकेश गोनलावार ,निलिन आत्राम,लक्ष्मण कोवे ,सुरेश आत्राम व आदि तरुणांनी जाहीर प्रवेश घेतला.